Tuesday 26 February 2008

देशप्रेमी लियांडर पेस

तो ज्यावेळी मैदानात असतो त्यावेळी प्रत्येक क्षणाला भारताचे प्रतिनिधित्व करत असतो. खेळताना तो देशासाठी खेळतोय याचा प्रत्यय त्याचा प्रत्येक सामना बघितल्यानंतर येतोच. असा आपला टेनिसपटू लियांडर पेस नेहमीच देशप्रेमाने भारावून गेलेला असतो.

ह्या सगळयाचा उल्लेख करायचे महत्त्वाचे कारण म्हणजे सद्या भारतीय टेनिस क्षेत्रात उद् भवलेला वाद. खेळाडुंचा म्हणे लियांडरवरचा विश्वास उडालाय. या खेळाडुंना लियांडर कप्तान म्हणून नको आहे. तो हुकूमशाह सारखा वागतो असे या सहखेळाडूंना वाटते.

खर तर हा वैयक्तीक स्वरुपाचा वाद असावा पण त्यात पेस वर करण्यात आलेले आरोप निषेधास पात्र आहेत. देशासाठी जिवाचे रान करुन खेळणाऱ्या या महान टेनिसपटूवर असे आरोप फक्त आपल्याच देशात होउ शकतात.

डेव्हिसकप असो वा दोहा आशियाई खेळ पेसची जिद्द आणि देशप्रेम अतुलनिय आहे. अशा या महान भारतीय व्यक्तीस माझा सलाम.

आगे बढो पेस हम तुम्हारे साथ है ।

-वामन परुळेकर

Friday 15 February 2008

मराठी नगरी ?

मराठी नगरी ?

"अरे महेश वो रीझल्ट लगा क्या? मुझे केटी नही ना?"

"अरे नही रे शायद कल लगेगा"
दोन अस्सल मराठी मुलांमधला हा संवाद.


हे चित्र आजकाल कुठेही पहायला मिळेल. काही तथाकथीत शिकलेली मराठी माणस मराठी बोलायला लाजतात. काहीजणांचा असाही समज आहे की मराठी बोलल तर आपल्याला जुनाट समजल जाईल. येथे मराठी माणस मराठी बोलण्याबाबत उदासिन आहेत आणि आपण इतरांकडून अपेक्षा ठेवतोय. काय कारण काय असेल या उदासीनतेबाबत ? आपण जरुर याचा विचार केला पाहिजे. मराठी माणुस आपल्या आप्तस्वकियांचे पाय ओढण्यात तरबेज आहे. इथेही तोच नियम लागु होतो. कुणी मराठीत बोलु किंवा लिहु लागल की त्याच्या व्याकरणाचा तपास इतरांकडुन सुरु होतो. मान्य आहे की व्याकरणदृष्टया भाषाशुध्दी आवश्यक आहे पण नवखा व्यक्ती मात्र उदास होतो. सर्व मराठी बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्या लोकांना प्रोत्साहनाची गरज आहे.


पण काही लोक मात्र केवळ दिखाव्यासाठी हिंदी किंवा इंग्रजी वापरतात ते अयोग्य आहे. मी संगणकाचे स्नातकोत्तर शिक्षण घेत आहे मला गरजेपुरती इंग्रजी वापरावीच लागते पण माझ्या अभियांत्रिकी विद्यालयाच्या वर्गातुन बाहेर पडलो की मी आग्रहाने मराठीतच बोलतो.



आपल्या भाषेसाठी आपण जागरुक राहिले पाहिजे. मग दुसऱ्यांना दोष देण्यात अर्थ नाही. मी शिर्डीला गेलेलो तेव्हा महाराष्ट्राबाहेर आंध्रप्रदेश मध्ये गेल्या सारखे वाटले. सगळीकडे न समजणाऱ्या भाषेतून पाटया होत्या. आता नियम असतानाही ह्या पाटया लागल्याच कश्या ? तेथिल स्थानिक मराठी अधिकारी गप्प कसे राहिले? याचा अर्थ असा होतो की आपण जागरुक नाही आहोत. इतर राज्यात कुठेही मराठी पाटी दिसते का?


मराठी भाषा संवर्धन करायची असेल तर आपणच प्रथम मराठी बोलल आणि लिहिल पाहिजे.
धन्यवाद


- वामन परुळेकर

Tuesday 12 February 2008

तिर्थक्षेत्र गणपतीपुळे,महाराष्ट्र

गणपतीपुळे येथील श्री गणेश मंदिरासमोरील प्रवेशव्दाराजवळचा हत्तीचा पुर्णाकृती पुतळा सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.


Monday 11 February 2008

इस्ट तिमोर कधी शांत होणार ?

इस्ट तिमोर कधी शांत होणार ?
आत्ता बी.बी.सी. वर बातमी बघितली. शांततेसाठीच नोबेल पारीतोषीक विजेते इस्ट तिमोरचे राष्ट्रपती जोस रामोस होर्ता यांच्या वर आज खुनी हल्ला झाला. बंडखोरांनी त्यांच्या पोटात गोळ्या झाडल्या. आता त्यांची प्रकृती स्थीर आहे.

याच जोस रामोस होर्ता यांना १९९६ सालचे नोबेल पारीतोषिक प्रदान करण्यात आले होते. ते शांततेचे पुरस्कर्ते आहेत. ईस्ट तिमोरच्या स्वातंत्र्य चळवळीचे त्यांनी नेतृत्व केले होते.

२००२ साली या छोटया देशाला स्वातंत्र्यप्राप्ती झाली होती.

विंडोज एक्स्पी वर मराठी शब्द दिसत नाहित ?

विंडोज एक्स्पी वर मराठी शब्द दिसत नाहित ?

मग या सेटिंग्ज करुन पहा.

1) स्टार्ट बटण दाबुन कंट्रोल पॅनलला जा.
2) तुम्ही जर Category View वर असाल तर "Date, Time, Language and Regional Options" हा आयकॉन सिलेक्ट करा आणि त्यानंतर "Regional and Language Options" हे सिलेक्ट करा.
3) आता "Regional and Language Options" सिलेक्ट करा.
४) आता Languages टॅब सिलेक्ट करा आणि खात्रि करुन घ्या की तुम्ही "Install files for complex script and right-to-left languages" हा ऑप्शन सिलेक्ट केला आहे. एक सुचना बॉक्स येइल येस वर क्लिक करा.
५) एक्स्पी ची सिडी लागेल काही फाईल्ससाठी ती इन्सर्ट करा.

हे सर्व यशस्वी करा ... आणि मराठी वापरा..

Friday 1 February 2008

दुसरा सुर्य


काल इंडिया टी.व्ही. वर बातमी बघितली की शास्त्रज्ञांना म्हणे दुसऱ्या सुर्याचा शोध लागलाय. हा दुसरा सुर्य आपल्या पृथ्वीपासुन आपला सुर्य जेवढया अंतरावर आहे त्याच्या दुप्पट अंतरावर आहे. मात्र दुर असला तरी त्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पृथ्वीपर्यंत पोहचू शकेल. मुळात हा दुसरा सुर्य म्हणजे एक धुमकेतु आहे त्याचा आकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि तो स्वयंप्रकाशित आहे.

चॅनेलवाल्यांचे असे म्हणणे आहे की हा आकार जर असाच वाढत गेला तर आपल्या पृथ्वीला दुसरा सुर्य मिळेल. त्यांचे असेही म्हणणे आहे की जर हा सुर्य कार्यान्वित झालाच तर आपल्याला चंद्राचे दर्शनच होणार नाही. पर्यायाने काळोखच होणार नाही. मला हे जरा अतिशयोक्ती वाटतय कारण कशावरुन हा दुसरा सुर्य पहिला सुर्य मावळल्यानंतर कार्यान्वित होईल ? याबद्दल आपले मत काय?

ShareThis

Registered With