Tuesday, 26 February 2008

देशप्रेमी लियांडर पेस





तो ज्यावेळी मैदानात असतो त्यावेळी प्रत्येक क्षणाला भारताचे प्रतिनिधित्व करत असतो. खेळताना तो देशासाठी खेळतोय याचा प्रत्यय त्याचा प्रत्येक सामना बघितल्यानंतर येतोच. असा आपला टेनिसपटू लियांडर पेस नेहमीच देशप्रेमाने भारावून गेलेला असतो.

ह्या सगळयाचा उल्लेख करायचे महत्त्वाचे कारण म्हणजे सद्या भारतीय टेनिस क्षेत्रात उद् भवलेला वाद. खेळाडुंचा म्हणे लियांडरवरचा विश्वास उडालाय. या खेळाडुंना लियांडर कप्तान म्हणून नको आहे. तो हुकूमशाह सारखा वागतो असे या सहखेळाडूंना वाटते.

खर तर हा वैयक्तीक स्वरुपाचा वाद असावा पण त्यात पेस वर करण्यात आलेले आरोप निषेधास पात्र आहेत. देशासाठी जिवाचे रान करुन खेळणाऱ्या या महान टेनिसपटूवर असे आरोप फक्त आपल्याच देशात होउ शकतात.

डेव्हिसकप असो वा दोहा आशियाई खेळ पेसची जिद्द आणि देशप्रेम अतुलनिय आहे. अशा या महान भारतीय व्यक्तीस माझा सलाम.

आगे बढो पेस हम तुम्हारे साथ है ।

-वामन परुळेकर

Friday, 15 February 2008

मराठी नगरी ?

मराठी नगरी ?

"अरे महेश वो रीझल्ट लगा क्या? मुझे केटी नही ना?"

"अरे नही रे शायद कल लगेगा"
दोन अस्सल मराठी मुलांमधला हा संवाद.


हे चित्र आजकाल कुठेही पहायला मिळेल. काही तथाकथीत शिकलेली मराठी माणस मराठी बोलायला लाजतात. काहीजणांचा असाही समज आहे की मराठी बोलल तर आपल्याला जुनाट समजल जाईल. येथे मराठी माणस मराठी बोलण्याबाबत उदासिन आहेत आणि आपण इतरांकडून अपेक्षा ठेवतोय. काय कारण काय असेल या उदासीनतेबाबत ? आपण जरुर याचा विचार केला पाहिजे. मराठी माणुस आपल्या आप्तस्वकियांचे पाय ओढण्यात तरबेज आहे. इथेही तोच नियम लागु होतो. कुणी मराठीत बोलु किंवा लिहु लागल की त्याच्या व्याकरणाचा तपास इतरांकडुन सुरु होतो. मान्य आहे की व्याकरणदृष्टया भाषाशुध्दी आवश्यक आहे पण नवखा व्यक्ती मात्र उदास होतो. सर्व मराठी बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्या लोकांना प्रोत्साहनाची गरज आहे.


पण काही लोक मात्र केवळ दिखाव्यासाठी हिंदी किंवा इंग्रजी वापरतात ते अयोग्य आहे. मी संगणकाचे स्नातकोत्तर शिक्षण घेत आहे मला गरजेपुरती इंग्रजी वापरावीच लागते पण माझ्या अभियांत्रिकी विद्यालयाच्या वर्गातुन बाहेर पडलो की मी आग्रहाने मराठीतच बोलतो.



आपल्या भाषेसाठी आपण जागरुक राहिले पाहिजे. मग दुसऱ्यांना दोष देण्यात अर्थ नाही. मी शिर्डीला गेलेलो तेव्हा महाराष्ट्राबाहेर आंध्रप्रदेश मध्ये गेल्या सारखे वाटले. सगळीकडे न समजणाऱ्या भाषेतून पाटया होत्या. आता नियम असतानाही ह्या पाटया लागल्याच कश्या ? तेथिल स्थानिक मराठी अधिकारी गप्प कसे राहिले? याचा अर्थ असा होतो की आपण जागरुक नाही आहोत. इतर राज्यात कुठेही मराठी पाटी दिसते का?


मराठी भाषा संवर्धन करायची असेल तर आपणच प्रथम मराठी बोलल आणि लिहिल पाहिजे.
धन्यवाद


- वामन परुळेकर

Friday, 1 February 2008

दुसरा सुर्य



काल इंडिया टी.व्ही. वर बातमी बघितली की शास्त्रज्ञांना म्हणे दुसऱ्या सुर्याचा शोध लागलाय. हा दुसरा सुर्य आपल्या पृथ्वीपासुन आपला सुर्य जेवढया अंतरावर आहे त्याच्या दुप्पट अंतरावर आहे. मात्र दुर असला तरी त्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पृथ्वीपर्यंत पोहचू शकेल. मुळात हा दुसरा सुर्य म्हणजे एक धुमकेतु आहे त्याचा आकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि तो स्वयंप्रकाशित आहे.

चॅनेलवाल्यांचे असे म्हणणे आहे की हा आकार जर असाच वाढत गेला तर आपल्या पृथ्वीला दुसरा सुर्य मिळेल. त्यांचे असेही म्हणणे आहे की जर हा सुर्य कार्यान्वित झालाच तर आपल्याला चंद्राचे दर्शनच होणार नाही. पर्यायाने काळोखच होणार नाही. मला हे जरा अतिशयोक्ती वाटतय कारण कशावरुन हा दुसरा सुर्य पहिला सुर्य मावळल्यानंतर कार्यान्वित होईल ? याबद्दल आपले मत काय?

- वामन परुळेकर

वामन परुळेकर ब्लॉग


ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

पुन्हा जरुर भेट द्या.

सर्वाधिकार @ वामन परुळेकर २००८


[ मराठी समुदाय ][ मराठी क्लिकर][ ईस्ट साउथ इंडीया ][ रत्नागिरी ]