Sunday 16 February 2014

एम.सी.ए. प्रवेश परीक्षा २०१४



 एम.सी.ए. (Master of Computer Application) ही पदव्युत्तर पदवी संगणक अभियांत्रीकी क्षेत्रातली अग्रणी अशी पदवी आहे. जिथे सर्वच क्षेत्रातील पदवीधारक प्रवेश मिळवू शकतात. या पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम अशारीतीने तयार करण्यात आला आहे की सर्वच क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या पदवीला प्रवेश घेता येवू शकेल. व्यवस्थापन, गणित आणि संगणकशास्त्र या तीनही विषयांचा पदवीच्या अभ्यासक्रमात समावेश आहे. विशेषतः व्यवस्थापन क्षेत्रातील अनेक विषय या पदवीला शिकता येत असल्यामुळे या पदवीची उपयुक्तता वाढते. देशातील अनेक विद्यापीठे एम.सी.ए. ही पदवी प्रदान करतात. मुंबई विद्यापीठाची एम.सी.ए. पदवी ही तीन वर्षाची (सहा सेमिस्टर) पदवी आहे. शेवटचे सेमिस्टर हे प्रोजेक्ट वर्क साठी राखीव असते. याचा फायदा मुलांना होतो. कंपनीमध्ये काम कोणत्या स्वरूपाचे असते याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळतो. 


अभ्यासक्रम आणि उपयुक्तता 
 
एम.सी.ए. या कोर्स मध्ये पी.एच.पी., सी.प्लस.प्लस, जावा, डॉट नेट, टेस्टिंग, जी.आय.एस., मोबाईल टेक्नोलॉजी, कॉम्पुटर ग्राफिक्स, मल्टिमीडिया, ईबिसिनेस, सी.आर.एम., डेटाबेस कन्सेप्ट या व इतर अनेक नवीन विषयांचा समावेश होतो. करिअरच्या दृष्टीने ही पदवी उपयोगी ठरते. अनेक क्षेत्रांमध्ये करीअर करता येवू शकतो. बँकिंग, संगणक प्रणाली, सरकारी नोकरी, टेस्टिंग, व्यवस्थापन क्षेत्र, संगणक व्यवसाय, वेब डिझाईन या इतर अनेक क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी निर्माण होतात.

प्रवेश परीक्षा आणि पात्रता
गेल्यावर्षीपासून थेट द्वितीय वर्ष प्रवेश सुरु झाला आहे. थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळविण्यासाठी बी.सी.ए., बी.एस्सी (संगणकशास्त्र) ही पदवी असणे आवश्यक आहे. बी.कॉम. किंवा अन्य कोर्सचे विद्यार्थी प्रथमवर्ष एम.सी.ए. ला प्रवेश घेवू शकतात. दोन्ही प्रकारच्या प्रवेशासाठी १२वी किंवा पदवीला गणित हा विषय असणे आवश्यक आहे. एम.सी.ए. या कोर्सला प्रवेश मिळण्यासाठी पदवी परीक्षेत खुल्या गटासाठी साठी ५० टक्के तर राखीव गटासाठी ४५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. एम.सी.ए. कोर्सला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. डी.टी.ई. महाराष्ट्र एम.सी.ए. प्रवेश परीक्षा आयोजित करते. ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपाची असते. या परीक्षेत दोन पेपर प्रत्येकी १०० गुणांचे असतात. पेपर पहिला सामान्य चाचणी (४५ मिनिटे) तर पेपर दुसरा पायाभूत संगणक ज्ञान (४५ मिनिटे). प्रत्येक पेपर मध्ये २५ प्रश्न समाविष्ट असतात. प्रत्येक अचूक उत्तराला ४ गुण दिले जातात. चुकीच्या उत्तरासाठी एक गुण कमी केला जातो. एखाद्या प्रश्नाच उत्तर दिल नाही तर शून्य गुण मिळतात. २०१४-१५ या शैक्षणिक वर्षासाठी सदर प्रवेश परीक्षा ३० मार्च २०१४ रोजी घेतली जाणार आहे.

अर्ज कसा करावा

ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपाची असते तसेच या परीक्षेचा अर्जही ऑनलाईन करावा लागतो. १० ते २४ फेब्रुवारी दरम्यान विद्यार्थी http://www.dtemaharashtra.gov.in/mca2014 या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन अर्ज करू शकतात. संकेतस्थळावर खाते खोलल्यावर युजरनेम आणि पासवर्ड कायम लक्षात ठेवण गरजेच आहे. या युजरनेम आणि पासवर्डचा उपयोग भविष्यात होणार आहे. सदर संकेतस्थळावरून डेबिट कार्ड किंवा ऑनलाईन बँकिंगचा वापर करून फी देखील भरता येते किंवा चलन प्रिंट करून एक्सिस बैंकच्या जवळच्या शाखेत पैसे भरता येतात. ७ एप्रिलला या परीक्षेचा निकाल जाहीर होईल. आवश्यक कागदपत्र छाननी १४ मे  ते २३ मे २०१४ या काळात ए.आर.सी. मधे होईल. त्यानंतर ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरणे आवश्यक असते.

अंतिम दिनांक - २४ फेब्रुवारी २०१४    

संपर्कासाठी पत्ता -
DIRECTORATE OF TECHNICAL EDUCATION Maharashtra State
3, Mahapalika Marg, Opp. Metro Cinema, Dhobi Talao,
Post Box No. 1967, Mumbai-400001
Helpline: 022-30233444/445/446
Telephone: 022-22641150, 22641151
Fax: 022-22692102, 22690007
E-Mail: desk2a@dte.org.in
 
-          प्रा. वामन राधाकृष्ण परुळेकर

Saturday 15 February 2014

असंविधानिक :)

भ्रष्टाचार करण संविधानिक, लूटमार करण संविधानिक, चोरीमारी करण संविधानिक, अध्यक्षावर खुर्ची फेकण संविधानिक, माईक तोडण संविधानिक, बील फाडून त्यावर नाचण संविधानिक, आमदारांच्या सोयीची बील पास करून घेण संविधानिक पण जनहितकारी भ्रष्टाचारविरोधी जनलोकपाल मात्र असंविधानिक.....

Tuesday 11 February 2014

Anarchism

Anarchism is not a romantic fable but the hardheaded realization, based on five thousand years of experience, that we cannot entrust the management of our lives to kings, priests, politicians, generals, and county commissioners.
― Edward Abbey

Thursday 6 February 2014

अराजक

केजरीवाल अतिशय अराजक आहेत. त्यांनी मुख्यमंत्री झाल्यावर एखाद्या सभ्य राजकारण्यासारख वर्तन ठेवल पाहिजे. दिल्लीत बलात्कार होतायत, सेक्स रेकेट चालवल जातय ?? ड्रग्ज माफिया थैमान घालत आहेत ?? पोलीस ऐकत नाहीत? मग काय झाल ? इतर राज्यात होत नाहीत का? या सगळ्यावर एक चौकशी आयोग नेमायचा आणि मस्त AC लावून घरी झोपायचं. रस्त्यावर झोपायची काय गरज? इतर राजकारणी लोकांचा तरी विचार करायचा. ३-४ महिन्यात रिपोर्ट येईल त्यावेळी जमल तर कारवाई होईलच ना. केजरीवाल जरा अतीच करतात. काय गरज होती त्या भारतीना त्या वस्तीत जायची. गेली अनेक वर्षे तिकडे कोणी गेला का? फार तर फार सामान्य जनता, पुजारी तक्रारी लिहितील. अशा तक्रारी कचऱ्याच्या टोपलीत फेकल्या जातील. जे काही चाललंय ते योग्यच चाललाय. उगीच यांच नाटक. म्हणे पोलीस कारवाई करत नाही? दिल्ली पोलिसांवर काहीही आरोप करायचे? देशात सगळ्यात जास्त गुन्हे घडले म्हणून काय झाल? ते तर होतच असतात. बडे बडे शहरो मे छोटी छोटी चीजे होती रहती है....उगाच मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घालू नये. मुख्यमंत्री तुम्ही एखाद्या चित्रपटाच्या रिलीज पार्टीला जा नाहीतर परदेश दौऱ्यावर जा ना. मुख्यमंत्री पदाला काही शोभा आहे की नाही. हे अजिबात खपवून घेतल जाणार नाही.

Wednesday 5 February 2014

Here’s my Facebook film.

Here’s my Facebook film. Find yours at https://facebook.com/lookback/ #FacebookIs10

Wednesday 29 January 2014

समाजकंटक

काल आणि परवा फेसबुकवर हैदराबाद मध्ये भारतीय ध्वज जाळला ही बातमी जाणीवपूर्वक पसरविण्यात येत होती. ती बातमी आणि फोटो फेक निघाला आहे. मूळ फोटो पाकिस्तान मधील असून भारताला जवळचे मित्र राष्ट्र हा दर्जा पाकिस्तानने दिल्यानंतर त्याविरुद्ध आणि नाटो विरुद्ध झालेल्या मोर्चात आपला ध्वज जाळण्यात आला होता. परंतु सदर फोटोचा उपयोग काही समाजविघातक तत्वांनी समाजकंटकांनी देशातील शांतता आणि सुव्यवस्था बिघडविण्यासाठी केला.....खऱ्या बातमीची लिंक --- http://topnews360.tmcnet.com/topics/associated-press/articles/2011/12/01/240305-nato-raid-pakistan-undercuts-rapprochement.htm

ShareThis

Registered With