एम.सी.ए. (Master of Computer Application) ही पदव्युत्तर पदवी
संगणक अभियांत्रीकी क्षेत्रातली अग्रणी अशी पदवी आहे. जिथे सर्वच क्षेत्रातील
पदवीधारक प्रवेश मिळवू शकतात. या पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम अशारीतीने तयार
करण्यात आला आहे की सर्वच क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या पदवीला प्रवेश घेता येवू
शकेल. व्यवस्थापन, गणित आणि संगणकशास्त्र या तीनही विषयांचा पदवीच्या अभ्यासक्रमात
समावेश आहे. विशेषतः व्यवस्थापन क्षेत्रातील अनेक विषय या पदवीला शिकता येत
असल्यामुळे या पदवीची उपयुक्तता वाढते. देशातील अनेक विद्यापीठे एम.सी.ए. ही पदवी
प्रदान करतात. मुंबई विद्यापीठाची एम.सी.ए. (तंत्रज्ञान विभाग) पदवी ही तीन वर्षाची (सहा सेमिस्टर)
पदवी आहे. शेवटचे सेमिस्टर हे प्रोजेक्ट वर्क साठी राखीव असते. याचा फायदा मुलांना
होतो. कंपनीमध्ये काम कोणत्या स्वरूपाचे असते याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळतो.
अभ्यासक्रम आणि उपयुक्तता
एम.सी.ए. या कोर्स मध्ये पी.एच.पी., बूटस्त्राप, जे क्वेरी, सी.प्लस.प्लस, जावा, डॉट नेट, टेस्टिंग, जी.आय.एस., मोबाईल टेक्नोलॉजी, कॉम्पुटर ग्राफिक्स, मल्टिमीडिया, ईबिसिनेस, सी.आर.एम., डेटाबेस कन्सेप्ट या व इतर अनेक नवीन विषयांचा समावेश होतो. करिअरच्या दृष्टीने ही पदवी उपयोगी ठरते. अनेक क्षेत्रांमध्ये करीअर करता येवू शकतो. बँकिंग, संगणक प्रणाली, सरकारी नोकरी, टेस्टिंग, व्यवस्थापन क्षेत्र, संगणक व्यवसाय, वेब डिझाईन या इतर अनेक क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी निर्माण होतात.

प्रवेश परीक्षा आणि पात्रता
एम.सी.ए. या कोर्सला प्रवेश मिळण्यासाठी १२वी किंवा पदवीला गणित हा विषय असणे आवश्यक आहे तसेच पदवी परीक्षेत खुल्या गटासाठी साठी ५० टक्के तर राखीव गटासाठी ४५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. एम.सी.ए. कोर्सला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. डी.टी.ई. महाराष्ट्र एम.सी.ए. प्रवेश परीक्षा आयोजित करते. ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपाची असते. या परीक्षेत दोन पेपर प्रत्येकी १०० गुणांचे असतात. पेपर पहिला सामान्य चाचणी (४५ मिनिटे) तर पेपर दुसरा पायाभूत संगणक ज्ञान (४५ मिनिटे). प्रत्येक पेपर मध्ये २५ प्रश्न समाविष्ट असतात. प्रत्येक अचूक उत्तराला ४ गुण दिले जातात. चुकीच्या उत्तरासाठी एक गुण कमी केला जातो. एखाद्या प्रश्नाच उत्तर दिल नाही तर शून्य गुण मिळतात. २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी सदर प्रवेश परीक्षा २३ मार्च २०१९ रोजी घेतली जाणार आहे.
अर्ज कसा करावा
ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपाची असते तसेच या परीक्षेचा अर्जही ऑनलाईन
करावा लागतो. १ ते २२ फेब्रुवारी दरम्यान विद्यार्थी https://info.mahacet.org/MAH-MCA-CET-2019/
या संकेतस्थळावर
जावून ऑनलाईन अर्ज करू शकतात. संकेतस्थळावर खाते खोलल्यावर युजरनेम आणि पासवर्ड कायम
लक्षात ठेवण गरजेच आहे. या युजरनेम आणि पासवर्डचा उपयोग भविष्यात होणार आहे. सदर संकेतस्थळावरून डेबिट कार्ड किंवा ऑनलाईन बँकिंगचा
वापर करून फी देखील भरता येते किंवा चलन प्रिंट करून एक्सिस बैंकच्या जवळच्या शाखेत पैसे
भरता येतात. ७ एप्रिलला या परीक्षेचा निकाल जाहीर होईल. आवश्यक कागदपत्र छाननी अंदाजे १ जुलै ते १५ जुलै या काळात ए.आर.सी. मधे होईल.
त्यानंतर ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरणे आवश्यक असते.
अंतिम दिनांक - २८ फेब्रुवारी २०१९
संपर्कासाठी पत्ता -
State CET Cell, Maharashtra State,
Mumbai.8th Floor, New Excelsior Building,
A. K. Nayak Marg, Fort, Mumbai- 400 001.
Tel: 022 – 22016157 / 59/ 53/ 34/ 19/ 28

- -
प्रा. वामन राधाकृष्ण परुळेकर
No comments:
Post a Comment