Tuesday 2 October 2012

दुर्मिळ छायाचित्र

कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि भाऊराव गायकवाड

अतिशय दुर्मिळ छायाचित्र...महाराष्टाचे शिल्पकार एकत्र एकाच छायाचित्रात......यातील सर्वच माझे आदर्श आहेत. त्यांच्यातील थोडे चांगले गुण घेण आयुष्यात जमल तरी आयुष्याच सार्थक होईल..

Saturday 2 June 2012

हिंदी चित्रपटांचा रावडी हंगाम

उन्हाळी हंगाम हा पुन्हा एकदा हिंदी सिनेमाचा सुवर्ण हंगाम ठरला. लाखोंच पोट भरणाऱ्या या चित्रपट उद्योगाने या दरम्यान खूप नफा कमवला. ६ चित्रपट सुपर हिट झाले तर दोन हिट. सर्वात जास्त अक्षय कुमारच्या हाउसफुल २ ने कमावले. आजच्या तारखेपर्यंत ११५ कोटी रुपये हाउसफुल २ ने कमावले आहेत. एका मागून एक सुपरहिट चित्रपट देणारा सुपरस्टार इम्रान हाशमी कसा मागे राहील. त्याचा जन्नत २ सुपरहिट ठरला. एकूण ४३ करोड या चित्रपटाने कमावले आहेत आणि अजूनही चित्रपट चांगलाच चालतो आहे. इशकजादे आणि विकी डोनर हे दोन्ही चित्रपट सुपरहिट झाले. दोन्ही चित्रपटांची ३७ करोड ची कमाई झाली आहे.

आता या यशस्वी चित्रपटांच्या यादीत रावडी राठोड ची भर पडणार आहे. पहिल्याच दिवसात रावडी राठोड चित्रपटाने १६ करोड ची कमाई केली आहे जी रेकॉर्डतोड कमाई आहे. सिंगल स्क्रीनला तर हा चित्रपट १००% चालतोय. अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी ही एक चांगली बातमी आहे. अक्षयचा हा एका वर्षातला दुसरा सुपरहिट चित्रपट आहे. या महिन्यात इम्रानचा शांघाय रिलीज होणार आहे. या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. कायम सुपरहिट देणारा इम्रान हाशमी आपल रेकॉर्ड कायम ठेवेल हे प्रोमो वरूनच कळून येतय.

Wednesday 25 April 2012

संत बसवेश्वर


लिंगायत मानवता धर्माचे संस्थापक संत बसवेश्वर

आज क्रांतीकारक आणि महान समाजसुधारक संत बसवेश्वर यांची जयंती आहे. बाराव्या शतकात या महान विचारवंताने जी क्रांती केली त्याची दखल जगभरात घेतली गेली. लिंगायत मानवता धर्माचे संस्थापक असलेले बसवेश्वर समता वादी होते. तत्कालीन सनातनी हिंदू धर्मावर बसवेश्वरांनी आसूड ओढले. अंधश्रद्धेने ग्रस्त झालेल्या तत्कालीन समाजाला पुनर्जिवन देण्याचे काम महात्मा बसवेश्वर यांनी केले. 

संत बसवेश्वर यांचा जन्म इ.स.११३२ मध्ये कर्नाटकात विजापूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी येथे वै. शु. अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर झाला. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे बसवेश्वरांना लहानपणापासून समाजातील असमानतेबद्दल प्रचंड चीड होती. दलितांवर हिंदू उच्चवर्णींयांकडून होणारे अत्याचार बसवेश्वरांना सहन होत नव्हते म्हणूनच वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी आपली मुंज करून घेण्यास स्पष्ट नकार दिला व आपल्या पालकांना अट घातली की जर दलितांची, शूद्रांची मुंज होत असेल तरच मी माझी मुंज होऊ देईन. एवढ्या लहान वयात बसवेश्वरांनी समाजव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले होते.  सामाजिक समता हाच बसवेश्वरांच्या तत्वज्ञानाचा मूळ गाभा होता. मी जेव्हा जेव्हा संत बसवेश्वरांच चरित्र वाचतो तेव्हा माझ्या अंगावर काटा उभा राहतो. शेकडो वर्षापूर्वी ज्याकाळी अंधश्रद्धा आणि कर्मकांडाचा प्रचंड पगडा जनमानसावर होता. शूद्रांवर अनन्वीत अत्याचार होत होते. त्याकाळात बसवेश्वरांनी जे धाडस केल त्याने मी पूर्ण प्रभावित झालोय. एक व्यक्ती या सर्वांविरुद्ध उभा राहतोय आणि एक यशस्वी लढा देतोय ह्याची कल्पनाही करवत नाही. संत बसवेश्वरांनी जे काही कार्य केले ते कार्य सुवर्णअक्षरांनी लिहून ठेवलेला इतिहास झालाय. अवघ्या ३५ वर्षाच आयुष्य (११३२ ते ११६७) आणि या अल्प आयुष्यात बसवेश्वरांनी बहुजन जनतेसाठी प्रचंड कार्य केले. माणूस आणि माणुसकी हा बसवेश्वरांचा मूलमंत्र होता. त्यांनी अस्पृश्यता, जातीयवाद, कर्मकांड, अनेक देवतावाद, स्त्री – पुरुष भेदाभेद ह्या विरुद्ध लढा दिला.

११४१ मध्ये बसवेश्वरांनी ‘अनुभव मंडप’ या पहील्या लोकशाही संसदेची स्थापना केली. या संसदेची रचना समाजातील सर्व जातींना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी होती. पहिल्या संसदेत मांग, महार, शिंपी, बहुरूपी, मेंढपाळ, धनगर, धोबी, कोळी, शेतकरी, न्हावी, गुराखी, महिला असे सर्व समाजाचे प्रतिनिधी सामील झाले. जातीयता नष्ट करणे हे संत बसवेश्वरांचे पहिले उद्दिष्ट होते. या संसदेत स्त्रीयांसाठी विशेष आरक्षण होते. संत बसवेश्वरांनी विधवापुनर्विवाहास पूर्ण मान्यता दिली त्याचवेळी बालविवाहास विरोध केला. शेकडो वर्षापूर्वी जातीयता नष्ट करण्यासाठी संत बसवेश्वरांनी आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार केला. एवढ करून ते थांबले नाहीत. त्यांनी स्वत: अनुभव मंडप संसदेत एका ब्राम्हण मुलीचा विवाह एका अस्पृश्य मुलाशी करून आंतरजातीय विवाहाची मुहूर्तमेढ रोवली. ते अनेक वेळा अस्पृश्यांच्या घरी जेवण करत असत. अस्पृश्यांना स्वत:च्या घरी मुक्त प्रवेश देत असत.

बसवेश्वर यांच्या यां कार्यामुळे तत्कालीन धर्म कट्टरवादी चिडले. बसवेश्वराना बहिष्कृत करण्यात आले. त्यांना पंतप्रधान पद सोडाव लागले. अनेक भ्रष्टाचाराचे खोटे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले. चौकशी अंती त्यांचा प्रामाणिकपणा सिद्ध झाला आणि संत बसवेश्वरांची कीर्ती संपूर्ण भारतात पसरली.  बसवेश्वर यांची अनुभव मंडप ही संसद भारतात लोकप्रिय होत गेली. अनेक लोक या क्रांतीत सहभागी झाले. मंडपात येणाऱ्या मागासवर्गीय लोकांनाही बसवेश्वरांनी देवाच्या पूजेचा आणि धार्मिक शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार देण्यासाठी बसवेश्वर यांनीच पुढाकार घेतला. त्यांनी सुतक आणि विटाळ यां प्रथा नाकारल्या. वेश्या आणि विधवांचे पुनर्विवाह लावून दिले. स्त्रीयांसाठी साक्षरता केंदांची निर्मिती संत बसवेश्वर यांनीच केली. परिश्रम हीच खरी पूजा असे संत बसवेश्वरांना वाटायचे. त्यामुळे कष्टाचे महत्व त्यांनी सामान्य जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न केला.  
      
संत बसवेश्वर यांनी जातीयता मोडून काढण्याचा पूर्ण प्रयत्न केला. बाराव्या शतकात जातीयतेची निरर्थकता समाजाला पटवून दिली. सनातनी धर्मांध लोकांकडून हीन वागणूक मिळूनही बसवेश्वर खचले  नाहीत. ईश्वरप्राप्ती साठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही हाच संदेश बसवेश्वर यांनी दिला. व्यक्तीच्या जन्मावरून नव्हे तर त्याच्या कार्यावरून त्याची ओळख निर्माण होते हे बाराव्या शतकात लोकांना पटवून देणे सोप नव्हत पण बसवेश्वरांनी ते साध्य केल. संत बसवेश्वरांकडे प्रचंड दूरदृष्टी होती. संपत्तीचे योग्य वाटप कसे व्हावे, स्त्रियांना कसे योग्य स्थान दिले जावे, जातीभेद कसा नष्ट केला जावा या आणि अनेक विषयांवर त्यांनी वेळोवेळी अनुभव मंडपात मार्गदर्शन केले. आजही बसवेश्वरांनी दिलेल्या शिकवणीची समस्त मानवी समाजास गरज आहे. भारतीय समाजात क्रांतीच बीज पुरणारया या महामानवास विनम्र अभिवादन.

Friday 20 April 2012

Mahatma's Fake Photo on Facebook

Exclusive

Friends recently I found certain pictures of Mahatma Gandhi on various social networks like Facebook and all these pics are fake pics created by Gandhi Haters. This is one proof for all of u. You will realize that if you just take a closer look on these pics.

So Plz think twice while sharing such Deshdrohi Material...


This man is an Australian actor posing as Gandhi at an Charity Gala in Sydney.

Tuesday 10 April 2012

रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर

रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर

आजवर ज्या महान व्यक्तींनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्ची घातले त्या महापुरुषांचा वारसा पुढे न्यायचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. आज आपण अशाच एका महान समाजसुधारकाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या व्यक्तीने  समाजाच्या आणि गावाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी आपल पूर्ण आयुष्य खर्च केलं त्या व्यक्तीबद्दल लिहायला मिळणे हे मी माझ भाग्य समजतो. निर्भय समाजसुधारक, भाषाशास्त्रज्ञ आणि उदारमतवादी विचारवंत कै. रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर यांचा जन्म २४ डिसेंबर १८५० या दिवशी अहमदनगर येथे लष्करी छावणीत झाला. त्यांचे वडील कै. धोंडजी सखाराम खानोलकर हे ब्रिटीश लष्करात नोकरीस होते. धोंडजी खानोलकर हे बुद्धीमान, नम्र आणि विद्याव्यासंगी होते. त्यांच्या या स्वभावगुणांमुळे ते लष्करात खूप लोकप्रिय होते. त्यांना तीन मुलगे आणि एक मुलगी अशी चार अपत्ये होती. डॉ. रामजी हे जेष्ठ चिरंजीव. डॉ. रामजी अत्यंत हुशार असल्यामुळे वडीलांनी त्यांच्या उच्च शिक्षणाची सोय केली. डॉ. रामजी खानोलकर यांचा जीवनप्रवास बराच खडतर होता. कराची येथे त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलं. रामजी सकाळी काम करायचे आणि रात्री एकाग्रतेने अभ्यास करायचे. त्यांनी स्वयंशिस्त कधीच मोडली नाही.

कुशाग्र बुद्धिमत्तेचे धनी असल्यामुळे वयाच्या २० व्या वर्षी ते मेडीकल स्कूलची परिक्षा उत्तीर्ण झाले. त्यांची नेमणूक लष्करामध्ये सब असिस्टंट सर्जन म्हणून झाली. त्यांनी लष्करासोबत अनेक देशांचा प्रवास केला. इराण, अफगाणिस्तान, एडन, चीन, अरबस्थान या देशांचा प्रवास त्यांनी केला. १८८६ साली त्यांची नेमणूक क्वेटा या शहरातील सरकारी लष्करी इस्पितळात झाली. १९०० च्या चीन मधील बॉक्सर युध्दात त्यांनी वैद्यकीय सेवा पुरवली. १९०६ साली ते सरकारी नोकरीतून निवृत्त झाले. निवृत्त झाल्यावर लोकाग्रहास्तव त्यांनी क्वेटयातच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. क्वेटा शहरात त्यांनी स्वत:चा खाजगी दवाखाना सुरू केला. क्वेटातील पंजाबी, बलुची, सिंधी, शीख जमातीमध्ये ते खूप लोकप्रिय होते. लोकांना रामजींबद्दल आदर आणि विश्वास होता. त्याकाळी दिवाण जमित राय आणि रामजी खानोलकर यांची "Grand Old Men of Quetta" अशी ओळख होती. एक कोकणी डॉक्टर बलूचीस्तानच्या क्वेटा शहरात निस्वार्थीपणे मानवसेवा करत होता याच अनेकांना आश्चर्य वाटायचं. त्यांच्या कार्याचा बलुची लोकांवर खूप प्रभाव होता.

रामजी चांगले डॉक्टर तर होतेच पण ते चांगले माणूस आणि नागरिक देखील होते. त्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ आणि मनमिळावू होता. अखिल मानवी समाजाबद्दल त्यांना प्रेम होते आणि त्यामुळेच ते आदरणीय होते. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. संकुचित दृष्टिकोन कधीच नव्हता. समाजाला सुधारायचे असेल तर शिक्षणाची गरज त्यांनी ओळखली आणि त्यामुळे त्यांनी ज्ञान आणि शिक्षणाच्या प्रसाराच पवित्र कार्य हाती घेतलं. समाजसुधारकांच्या नामावलीत रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर यांचे नाव बरेच वरचे आहे. परमवीरचक्राची निर्मिती करणाऱ्या सावित्रीबाई खानोलकर लिहितात की, "He initiated a campaign against the Temple artist system custom. It was mainly thanks to him that a law was passed by the British India in this respect. He encouraged villagers by arranging for their tutions and crusading in favor of laws to better the community."

रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर यांनी १८९२ साली जोरदार समाजसुधारणा मोहीम हाती घेतली. जुन्या लोकांनी सुरू केलेली ही मोहीम त्यांनी यशस्वीरित्या पुढे चालवली. सावंतवाडी संस्थानचे (सावंतवाडी, वेंगुर्ला,डिचोली,पेडणे,कुडाळ आणि मळेवाड) तत्कालीन पोलिटिकल एजंट कर्नल नट यांच्या सल्यानुसार त्यांनी प्रथम शिक्षणप्रसारावर भर दिला.  १९०३ साली मठ (पूर्वीचे सावंतवाडी संस्थान) ता. वेंगुर्ला येथे स्वखर्चाने शाळा सुरू करून सर्व समाजातील गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सोय करून दिली. सर्वच समाजाच्या विद्यार्थ्यांना त्यांनी अनेक शिष्यवृत्ती दिल्या. अनेक विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी खानोलकर यांनी शिष्यवृत्ती दिल्या. रायसाहेब यांनी गावच्या मुलभूत गरजा म्हणजेच विहिरी, धर्मशाळा आणि शिक्षणाची सोय ह्यावर लक्ष केंद्रीत केलं. आजही खानोलकरांनी स्थापन केलेले प्राथमिक विद्यालय आणि माध्यमिक विद्यालय दिमाखात उभे आहे आणि शिक्षणप्रसाराचे काम करत आहे. रायसाहेब रामजी खानोलकर यांचे समाजकार्य केवळ स्वत:च्या गावापुरते मर्यादित नव्हते. क्वेटातही त्यांनी बरेच समाजकार्य केले. क्वेटा येथे त्यांनी स्वखर्चाने बहुजनांसाठी धर्मशाळा स्थापन केली. रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर हे क्वेटामधील हिंदूपंचायत आणि स्वामी देशराज धर्मशाळा (प्रार्थना मंदीर) या संस्थांचे कित्येक वर्षे अध्यक्ष होते. त्यांच्या समाजसेवेच्या प्रभावामुळे क्वेटा येथील रस्त्याला "रामजी लेन" असे नाव दिले होते. आजही स्वतंत्र पाकिस्तानने हे नाव कायम ठेवले आहे. आजही क्वेटा मधील तो रस्ता रामजी लेन या नावानेच ओळखला जातो. पाकिस्तानमधील एका खाजगी कंपनीच्या वेबसाईटवर मिळालेला पत्ता त्याचाच पुरावा आहे.    
       
रायसाहेब रामजी खानोलकर हे संस्कृतचे प्रकांडपंडित होते. त्यांचा वेदांचा अभ्यास दांडगा होता. वेदांतील आदर्श जीवन जगण्याचा ते प्रयत्न करत. परोपकारी वृती मानवी जीवनात फार महत्त्वाची आहे. परोपकार विरहीत जीवन जगणारा मनुष्य हा कोणत्याही धर्मात धिक्कार करण्यासारखाच असतो. परोपकार करणारी कोणतीही व्यक्ती पूजनीय असते. प्राणी मेल्यावर त्याची चामडी जर उपयोगात येत असेल तर तो प्राणीही धन्य आणि पूजनीय बनतो.
परोपकारशून्यस्य धिक् मनुष्यस्य जीवितम् । 
जीवन्तु पशवो येषां चर्माप्युपकरिष्यति॥ 
कालिदासाच्या साहित्याचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. रायसाहेब  रामजी खानोलकर अतिशय सात्विक होते. ते पूर्ण शाकाहारी होते. त्यांना कधीही तंबाखू किंवा दारू इत्यादी व्यसनांचा स्पर्शही झाला नाही. रायसाहेब दर दोन वर्षांनी आपल्या मठ येथिल घरी येत असत. त्यावेळी वाटेत कराचीत ते आपल्या मित्रपरीवाराची जरूर भेट घेत असत. कराची मुक्कामात डॉ. दत्ताराम खानोलकर यांच्या घरी ते सर्वांची भेट घेत असत. डॉ. विश्वनाथ पाटील आणि तुकाराम कांदळगावकर हे त्यांचे खास मित्र होते. मुंबईत आल्यावर आद्य शिवचरित्रकार गुरुवर्य कृष्णराव केळूसकर यांची भेट घेतल्याशिवाय ते राहत नसत. त्यांच्याविषयी त्यांना प्रचंड आदर होता. आद्य शिवचरित्रकार गुरुवर्य कृष्णराव केळूसकर हे नाईक मराठा मंडळाचे संस्थापक होते. दोघेही एकाच समाजासाठी काम करत होते फक्त संस्था वेगळ्या होत्या. दोघांनाही एकमेकांविषयी प्रचंड आदर होता.      

आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद त्यांचे परम मित्र होते. रायसाहेबांनी आपल्या एका मुलाची रवानगी वैदिक ब्रम्हचारी चे जीवन जगण्यासाठी स्वामींच्या हरिद्वार येथिल आश्रमात केली होती. रायसाहेब धार्मिक होते. त्याचबरोबर धर्मसुधारणेवर त्यांचा भर होता. काशी येथे विद्वान पंडीतांची ते वेळोवेळी भेट घेत आणि चर्चा करत. रायसाहेब डॉ. खानोलकर यांच्या संस्कृत प्रेमाबद्दल लिहिताना सावित्रीबाई खानोलकर यांनी म्हटले आहे की,  "He had the perfect pronunciation of a Pundit and seemed to relish every word. Do you know that there are more than 20 words in Sanskrit for Water? He would tell me in the way people speak of some wonder of magic and then proceed to enlighten me as to each word and its meaning. I listened bemused and entranced by the music of those words even though I understood nothing of them at that time. I gather, it is from him that I acquired the love of Sanskrit and the desire to learn this perfect and alas neglected language." 

रायसाहेबांना इंग्रजी, हिंदी, संस्कृत, गुजराती, कन्नड, उर्दू, पुस्तू, पर्शियन इत्यादी भाषा अवगत होत्या. कालीदासाचे शाकुंतल तर त्यांना पूर्ण अवगत होते. तसेच पर्शियन कविता मुखोद्‌गत होत्या. रायसाहेब संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी दरवर्षी काशी येथील पंडीतांच्या सहवासात काही महिने घालवत असत. त्यांना वाचनाचे प्रचंड वेड होते. क्वेटा येथे त्यांचे स्वत:चे ग्रंथालय होते ज्यात जगातील दुर्मिळ ग्रंथांचा समावेश होता. १९३५ च्या दुर्दैवी भूकंपात हे ग्रंथालय जमीनदोस्त झाले. त्यांनी मुक्तवली कंठाभरणशाडंकर भाष्य हे संस्कृत ग्रंथ छापण्याचा कामी बरेच सहाय्य केले. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी संस्कृत-धात्वर्थ-मंजुषा नामक ग्रंथ लिहून प्रसिद्ध केला. या ग्रंथाला जर्मनीतून प्रचंड मागणी आली होती. त्यांनी काही काळ केसरी वृत्तपत्रासाठी लेखन केले. चीन मध्ये असताना चीनची संस्कृती तेथील चालीरीती या संबंधित लेखं "चीनची पत्रे " या सदरात लिहिले.

डॉ. खानोलकर यांचा परिवार बराच मोठा होता. त्यांचे आठ पुत्र, एक कन्या, सुना, नातू नाती, नोकर चाकर मिळून ३०-३५ लोकांचे मोठे कुटुंब होते. "बाबा" ह्या टोपणनावाने ते कुटुंबात प्रसिद्ध होते. संपूर्ण कुटुंबावर त्यांच लक्ष असे. क्वेटा मध्ये त्यांचा मोठा वाडा होता तसेच मठ वेंगुर्ले येथे मूळ घर होते. वाड्याची आणि कुटुंबाची जबाबदारी त्यांची पत्नी जानकी (ताई) खानोलकर यांच्यावर असे. डॉक्टरांनी सर्व कुटुंबियांना योग्य त्या सोयी पुरवल्या. त्यांच्या उच्चशिक्षणाची सोय केली. खानोलकरांच्या कुटुंबात शिक्षण हे सक्तीचेच होते. त्यांचे जेष्ठ पुत्र डॉ. विष्णुपंत रामजी खानोलकर यांनी वडीलांच्या इस्पितळात सर्जन म्हणून काम पाहिले. त्यांचे दुसरे पुत्र कर्करोगतज्ञ व मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. वसंतराव खानोलकर. मेजर जनरल विक्रम रामजी खानोलकर. नातू रावसाहेब मधुसूदन खानोलकर आणि डॉ. प्रकाश खानोलकर. सून सावित्री खानोलकर ज्यांनी परमवीर चक्राची निर्मिती केली. या सर्वांनी तसेच खानोलकरांच्या पुढच्या पिढीने रायासाहेबांची कीर्ती साऱ्या जगात पसरवली. रायसाहेबांचे बंधू कै. विठ्ठल खानोलकर यांनी आपल्या जेष्ठ बंधूने सुरू केलेले समाजकार्य तसेच चालू ठेवले. त्यांनीच मठ येथिल डॉ. खानोलकर हायस्कूल बांधून पूर्ण केल.                      
रायसाहेब डॉ. रामजी खानोलकर यांनी प्रामाणिकपणे जे समाजकार्य केले होते त्याची दखल तत्कालीन सरकारने घेतली. १९२८ साली त्यांना "रायसाहेब" हा खिताब देवून गौरविण्यात आले. १९३२ साली त्यांच्या ८४व्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत संपतराव गायकवाड, बडोदे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मित्रपरिवाराने श्री जगन्नाथ शंकरशेठ यांच्या दिवाणखान्यात त्यांचा मानपत्र देवून सत्कार केला.      

अशा या समाजसुधारकाचा आणि समाजनेत्याचा मृत्यू  ३१ मे १९३५ रोजी पहाटे ३:०२ मी. क्वेटा शहरात घडलेल्या भयानक भूकंपात झाला. त्यांच्या कुटुंबातील १३ सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू या भूकंपात झाला. क्वेटातील ६०००० लोकांचा मृत्यू या भूकंपात झाला होता. डॉ. खानोलकर विचारवंत, समाजसुधारक आणि बुद्धिवादी होते. त्यांनी आपल्या कार्याने स्वत:चा ठसा उमटवला. सामजिक बांधिलकी त्यांनी जपली होती. त्यांनी आपले आयुष्य समाजाच्या विकासासाठी खर्ची घातल. स्वत:चा आदर्श समाजासमोर ठेवला. कोकण आणि कोकणी लोक यांच्याबद्दल त्यांना फार आपुलकी होती. कोकणातील शिक्षणप्रसाराला त्यांनी हातभार लावला. त्यांचा मुत्यू दुर्दैवी होता पण त्यांच निस्वार्थी कार्य कायम आपल्या सर्वांच्या हृदयात राहील यात शंकाच नाही. त्यांचा आदर्श समाजासमोर ठेवण आणि त्यांच समाजकार्य पुढे चालू ठेवणे हे आता आपलं कर्तव्य आहे. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की असे महापुरुष ज्या समाजात जन्मले त्या समाजाचा अभिमान बाळगा आणि सर्वच मानवी समाजाच्या एकतेसाठी आणि विकासासाठी कार्यरत राहा. धन्यवाद.

जीवितान्मरणं श्रेष्ठ परोपकृतिवर्जितात् ।
मरणं जीवितं मन्ये यत्परोपकृतिक्षमम् ॥

1935 Balochistan earthquake

Monday 2 April 2012

आमची शाळा - भाग १

शाळा चित्रपट पाहिल्यावर मलाही माझ्या शाळांची आठवण झाली. अनेकवचन यासाठीच की माझे आजोबा आई वडील सगळेच प्राथमिक शिक्षक. सुभेदार मेजर पणजोबांनी हातात घेतलेली तलवार खाली ठेवल्यावर पुन्हा कुणी उचलली नाही. उचलली ती केवळ लेखणीच. असो तर महत्वाच हे की आई वडील दोघेही प्राथमिक शिक्षक असल्यामुळे आमची भटकी जमातच झाली होती. बदली झाली की शाळा बदलली. मी आरवलीत माझी बालवाडी पूर्ण केली. आरवली म्हणजे शिरोड्याच्या बाजूलाच पेडण्याहून अगदी जवळ. पुढे पहिली-दुसरी आणि तिसरी इयत्ता उभादांडा शाळा नं. २ मध्ये, चौथी ते सातवी मठ शाळा नं. १, आठवी - दहावी जनता विद्यालय तळवडे, अकरावी - बारावी राणी पार्वतीदेवी ज्यु. कॉलेज सावंतवाडी, पदवी शिक्षण कुडाळ आणि पदव्युत्तर रत्नागिरी.

कॉलेज विश्व हे एक वेगळंच जीवन असत. शाळा म्हटली की माझ्या डोळ्यासमोरून माझ पाचवी ते दहावीच जीवन एखाद्या फिल्मसारख सरकत जात. विशेषतः हायस्कूल. सावंतवाडीहून अर्ध्या तासाच्या अंतरावर तळवडे नावाच एक सुंदर गाव आहे. जबरदस्त सांस्कृतिक आवड असलेलं गाव. येथे बाराही महिने काही ना काही सांस्कृतिक कार्यक्रम असायचेच. मी त्यावेळी अनेक प्रसिद्ध नाटके याच गावातील रंगमंचावर पाहिली. श्रीमंत गाव. तर अश्या या गावात आमच श्री जनता विद्यालय आहे. शाळेतले ते दिवस आम्ही कधीही विसरू शकणार नाही. आमच्या या शाळेत तीन तुकड्या होत्या अ, ब आणि क. मी अ तुकडीतला विद्यार्थी होतो. गावातील तथाकथित सुशिक्षित लोकांना कॉन्व्हेंट च आकर्षण होत. पण अस आकर्षण आम्हाला कधीच नव्हत कारण जनता विद्यालयात जे शिक्षण मिळणार ते कितीतरी पटीने चांगल असेल याची आम्हाला खात्री होती.

तीन वर्षाने शाळेने मला बरच काही दिल. मला आमचे पाटकर सर कायम आठवतात. असा दरारा की लांबून त्यांना बघितलं की मुल पळून जायची. पाटकर सरांबद्दल आम्हा सर्वच विद्यार्थ्यांना भीतीयुक्त आदर होता. त्यांच्या हातचा मार खायची हिंमत कोणातच नव्हती. सरांचा तास असला की सर आम्हाला संपूर्ण जगाची फेरी मारून आणायचे. जागतिक घडामोडी आणि त्याचा परिणाम याची आवड मला याच दरम्यान निर्माण झाली. Y2K काय आहे हे आमच्यापेक्षा मोठया असलेल्या मुलांना माहिती नव्हते पण आम्हाला मात्र पूर्ण माहिती होती. कारण फक्त पाटकर सर. पेडणेकर सरांनी आम्हाला संघर्ष करायला शिकवलं. सहामाही परीक्षेत मराठीत केवळ ४८ मार्क्स मिळाल्याच दुःख माझ्यापेक्षा पेडणेकर सरांना जास्त होत. त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल आणि दहावीत मी ७८ गुण मराठीत मिळवले. शिस्त मोडल्यावर मालवणकर सर आणि गणिताच्या पवार सरांच्या हातचा मारही खाल्ला. मार कसला थोबाडीतच मारली होती. सगळ जग हलल्यासारख वाटल होत. पण एकदा मार खाल्ल्यावर पुन्हा शिस्त मोडण्याची हिंमत नाही झाली.

आमच्या वर्गात तशी इरसाल मुले होती. मला अजूनही आमचा अड्डा आठवतो. शाळा सुरु होण्यापूर्वी अर्धा तास आम्ही जवळच्या सातेरी मंदिरात जमायचो. त्यावेळी मी घोडेस्वार होतो अर्थात सायकल. हे मंदीर परिसर म्हणजे सायकल फिरविण्याची आवडती जागा. जरा पुढे उंचावर एक छोट मंदीर होत आता नाव नाही आठवत पण तोही आमचा अड्डा होता. प्रार्थना चुकविणारी मुले तिथे थांबायची. मला आठवतंय प्रार्थना चुकली तर शिक्षा असायची. चुकून कधी उशीर झालाच तर ही शिक्षा चुकविण्यासाठी आम्ही सरांची नजर चुकवून हळूच रांगेत घुसायचो. शाळेच लांबच्या लांब मैदान आम्ही फुटबॉल खेळण्यासाठी वापरायचो. दुपारची जेवणाची सुट्टी त्यासाठीच होती. पटापट डब्यातल खावून गेटावरच्या दुकानात जावून वाटाणे किंवा फुटाणे आणायचे (आम्लेट पाव ही आमच्यासाठी त्यावेळी पार्टी दिल्यासारखच होत.) आणि ते संपवून नंतर रबरी छोट्या बॉलने फुटबॉल खेळायचा हा आमचा नित्यक्रम झाला होता. मला आठवतय मी, दोन अमित, रोशन, कांता, विवेक आणि आमचे इतर मित्र कधी एकदा मैदानावर जायला मिळतय याची वाट पाहात असायचो.

किस्से अनेक आहेत पण कायम स्मरणात राहण्यासारखा किस्सा म्हणजे आमची शालेय निवडणूक अगदी थाटात असायची. मुख्यमंत्री, क्रीडामंत्री, वर्गमंत्री वगैरे सगळी पद असायची. मीही आयुष्यात पहिल्यांदा आणि शेवटची निवडणूक याच काळात लढलो. आमच्या शाळेत प्रचारही करणे बंधनकारक होत. अगदी सभा वगैरे सगळ चालायचं. मी क्रीडामंत्री या पदासाठी उभा होतो. तरी ४ उमेदवार रिंगणात होते. त्यात माझी उमेदवारी मजबूत होती. प्रचार सभा घेतली. गंमत म्हणजे माझ्या विरोधी पक्षातील मुलांनी मी काहीतरी आक्षेपार्ह बोललो आहे अशी अफवा पसरवली. ज्यांनी अफवा पसरवली त्यांच्याशी माझी बाचाबाची देखील झाली आणि माझ निवडणूक हरणं नक्की झाल. मतदानाचा दिवस उजाडला. निकाल माझ्यासाठी धक्कादायक होता. मला दोन नंबरची मत मिळाली होती. नियमाप्रमाणे मी उपमंत्री झालो होतो. केवळ दहा मतांनी मी हरलो होतो पण हा एक वेगळाच अनुभव होता. ज्या लोकशाही परंपरेनुसार आपला देश चालतो त्याच बाळकडूच आम्ही प्यालो होतो.

शाळा म्हटल की लाईन हा विषय आलाच पण त्या वयात ह्या सगळ्या गोष्टी होतच असतात. आम्ही एकमेकांना खूप चिडवल लाईनच्या नावावरून. अगदी बापाच्या नावावरुनही चिडवलय. आमच्याकडे बिलीमारो पण होता, बेलदार पण होता आणि टिंग्या पण होता अगदी प्रत्येक शाळेत असतो त्याप्रमाणे. शाळेबद्दल लिहाव तेवढ कमी आहे. शाळा सोडून जाताना प्रत्येकाला दुःख हे होत असतच. शाळा आपल्याला आठवणीची शिदोरी देते. आयुष्यभर पुरण्याइतकी.

Friday 17 February 2012

महाराष्ट्र जनमानस

महाराष्ट्रातील महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. १० पैकी ६ महानगरपालिका कॉंग्रेस आघाडीने जिंकल्या. मुंबईत सेनेन खरच करून दाखवल. नाशिकात मनसेला प्रचंड यश मिळालय. तसेच महाराष्ट्रातील ग्रामीण भागावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपली पकड कायम ठेवत २० जिल्हा परिषदांवर विजय मिळवला आहे. आघाडीचे ९०० उमेदवार निवडून आलेत. नारायण राणे यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आणि अजित पवारांना चोख उत्तर दिले. गोपीनाथ मुंडे यांनी देखील आपल्या जागा राखल्या. खरा फटका बसलाय तो भुजबळ आणि विखे पाटील यांना. मनसेने पुणे, नाशिक आणि नगर महानगरपालिकेत अनपेक्षित यश मिळवलं. पंचायत समिती निवडणुकांचे निकाल बघितल्यावर एकच गोष्ट लक्षात येते कि ग्रामीण महाराष्ट्रात जे संघटन कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीजवळ आहे त्या संघटनाला सेनेजवळ पर्याय नाही. याही निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे अण्णा हजारे यांचा कोणताही प्रभाव दिसला नाही.

Tuesday 14 February 2012

तेरेखोल किल्ला

तेरेखोल किल्ला पेडणे तालुक्याचा (उत्तर गोवा जिल्हा) भाग आहे. १७ व्या शतकात सावंतवाडी संस्थानचे महाराज खेम सावंत भोसले यांनी तेरेखोल किल्ला बांधला. १७६४ साली हा किल्ला पोर्तुगीजांनी ताब्यात घेतला. तेरेखोल गावाजवळील रेडी जरी वेंगुर्ला तालुक्यात येत असलं तरी हा किल्ला मात्र सध्या गोवा सरकारच्या ताब्यात आहे. सध्या किल्यात एक आलिशान हेरिटेज हॉटेल बांधण्यात आल असून किल्यात प्रवेश निवडक लोकांनाच मिळतो. तेरेखोल पाहण्यासाठी वेंगुर्ला आणि सावंतवाडी बसस्थानकावरून बसेस उपलब्ध आहेत. गोव्यातून जाण्यासाठी केरी मार्गे यावे लागेल. विशाल तेरेखोल नदी पार करण्यासाठी फेरी बोट उपलब्ध आहेत. केरी (गोवा) - तेरेखोल आणि पाल्ये (गोवा) - आरोंदा (वेंगुर्ला) फेरीबोट सेवा सतत सुरु असते. केरी तून म्हापसा आणि पेडणे बसेस सतत उपलब्ध असतात.


जवळची प्रेक्षणीय स्थळे
१) तेरेखोल नदी
२) तेरेखोल किल्ला
३) रेडी गणपती मंदीर
४) टाटा इस्पात कंपनी रेडी
५) आरोंदा
६) तेरेखोल हेरिटेज रिसोर्ट, गोवा सरकार
७) तेरेखोल बीच
८) शिरोडा बीच
९) आरवली वेतोबा (दक्षिण काशी)
१०) उभादांडा बीच
११) वेंगुर्ला
१२) केरी बीच (पेडणे)


फेसबुकवरील खोटा प्रचार

हा एक नवीन खोटा प्रचार. हा फोटो बघून मला धक्काच बसला. एखाद्या पक्षाविरुद्ध प्रचार करताना लोक एवढ्या खोट्या गोष्टी पसरवतील आणि त्याच्यावर आपले फेसबुककर एवढा विश्वास ठेवतील अस स्वप्नातही वाटल नव्हत. मित्रांनो डोळे झाकून शेअर करण सोडा. आपण नक्की काय शेअर करतोय याचा विचार करा. सत्यता पडताळून पहा. किती दिवस तुम्ही फसत राहणार. स्वतःच्या डोक्याचा वापर करा, एकाच संकुचित विचारधारेला वाहून घेवू नका. त्या ऐवजी डोळे उघडून जगाकडे पहा. मुद्देसूद टीका करणे वेगळ आणि टिंगलटवाळी, विकृत प्रचार करणे वेगळ. आज निदान माझ्या दहा मित्रांच्या Wall वर ही पोस्ट मला दिसली. 



सत्य हे आहे की लुईस ब्रेल हा कोणी इटालियन राजा नसून तो जगप्रसिद्ध ब्रेल लिपीचा जनक आहे. ब्रेल लिपीचा वापर अंध लोक लिहिण्या-वाचण्यासाठी करतात. पेशाने तो एक प्राध्यापक आणि संगीतकार होता. त्याचा जन्म आणि मृत्यू दोन्ही फ्रांस या देशात झाले. ब्रेलच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी म्हणजे १८५४ मध्ये फ्रांसने ब्रेल लिपीचा अधिकृतपणे स्वीकार केला. १८७३ च्या अंध शिक्षकांच्या जागतिक परिषदेनंतर ब्रेल लिपीचा प्रसार मोठया प्रमाणात युरोपात झाला. १९१६ मध्ये अमेरिकाने ब्रेल लिपीचा स्वीकार केला आणि १९३२ मध्ये इंग्लिश भाषेकरिता ब्रेल लिपी ठरविण्यात आली. मानवतेला फार मोठ योगदान देणाऱ्या ब्रेलची दखल जगातल्या सर्वच देशांनी घेतली. युरोपियन संघाने दोन विशेष नाणी चलनात आणली. अमेरिकेने एक डॉलरच्या नाण्यावर ब्रेलची दखल घेतली. बेल्जिअम, ईराण, चीन, इटली या देशांनीही ब्रेलचा फोटो असलेली नाणी चलनात आणून ब्रेलचा मरणोपरांत सन्मान केला. २००९ साली लुईस ब्रेल यांच्या २०० व्या जयंतीचे औचित्य साधून भारत सरकारनेही दोन रुपयाचे नाणे चलनात आणले. तोच हा फोटो. त्याचा वापर काही विकृत लोक प्रचारासाठी करत आहेत. कृपया जागे व्हा आणि अश्या समाजासाठी स्वत: आयुष्य वाहिलेल्या लोकांबद्दल खोटी माहिती पसरविणाऱ्या पोस्ट शेअर करू नका.

Monday 13 February 2012

कार्यकर्ता

हर पार्टी का सामान्य कार्यकर्ता अगर अपने नेता से जवाब मांगता रहे तो नेताओ की जवाबदेही बढेगी| राजनीती मे पारदर्शिता और शुचिता के लिये कार्यकर्ता का सजग होना बहोत महत्वपूर्ण है |

Saturday 11 February 2012

मी आणि माझे पूर्वज

पुरातन मंदीरे हे त्या त्या भागातल्या इतिहासाची स्मारकं असतात. कोकणातल्या प्रत्येक मंदिरात मूळपुरुष आणि ज्यांनी ते गाव वसवल त्यांच्या आठवणी प्रीत्यर्थ एक खास जागा राखून ठेवलेली असते. त्याव्यतिरिक्त मंदीरांची अंतर्गत रचना, मूर्तीकला आणि स्थापत्यकला ही माझ्या आकर्षणाची केंद्रे आहेत. ज्या काळात ही मंदिरे बांधली गेली त्याकाळातील स्थापत्यकला बघता येते. मंदिराव्यतिरिक्त इतर कोणतीही ऐतिहासिक वास्तू आपल्याकडे कोकणात एवढी जपून ठेवली जात नाही. साहजिकच त्यामुळे मला मंदिरे फिरायला आवडतात. अर्थात केवळ मंदिरात गेल्यामुळे मी सनातनी होत नाही किंवा मंदिरात जर भेदभावाची वागणूक दिली जात असेल तर त्यालाही माझा पाठींबा मुळीच नाही. मला कोकणातली मंदिरे जेवढी दर्शनीय वाटतात तेवढीच चर्च देखील. तसेच ईश्वर, अल्लाह आणि ख्रिस्त माझ्यालेखी एकच. 

आता प्रश्न राहिला माझ्या पूर्वजांचा तर त्यांच्या सनातनी असण्याने माझ्या विचारांवर कोणताही परिणाम होत नाही. मला ज्ञात मोठी उदाहरणे सनातनी नसलेल्या पुर्वजांची आहेत. माझे पूर्वज माझे पणजोबा सुभेदार मेजर विष्णू स. परुळेकर यांनी देवळात कधी पाउल ठेवल नव्हत तशी त्यांनी प्रतिज्ञा केली होती. त्यांचा देवावर विश्वास होता पण मंदिरावर नाही. सुधारणावादी आणि पुरोगामी अशी त्यांची ओळख होती. अर्थात त्याला कारण मंदिरात त्याकाळी बहुजनांना दिल्या जाणाऱ्या वागणूकीबद्दल त्यांच्या मनात चीड होती.

निवतीचे किल्लेदार बाळोजी नाईक परुळेकर यांनी समाजसुधारणेची मोहीम हाती घेतली होती. तेही धर्मिक वृत्तीचे होते पण सनातनी मुळीच नव्हते. नंतरच्या काळात सुभेदारांचे नातेवाईक असलेले डॉ. रायसाहेब रामजी खानोलकर यांनी जी समाजसुधारणा केली त्याला तोड नाही. बहुजनांच्या शिक्षणासाठी शाळा, हायस्कूल बांधले. धर्मशाळा बांधली. क्वेटा हिंदू परिषदचे ते अध्यक्ष होते. अनेक अशी कामे केली जी संपूर्ण मानवी समाजाच्या हिताची होती. डॉ. रायसाहेब रामजी खानोलकर हे संस्कृतचे पंडीत होते. रामकृष्ण मिशनचे सदस्य होते. माझे पूर्वज धार्मिक होते पण सनातनी नव्हते. हे सगळ लिहिण्यास कारण की नरेशजी यांच्या मनात जी शंका होती ती दूर करणे. कृपया गैरसमज नको. धन्यवाद..

Wednesday 8 February 2012

शाहू महाराजांचे विस्मरण ?

मायावतींनी अमेठीच नाव बदलून छत्रपती शाहूमहाराज नगर अस ठेवल आहे. मात्र कॉंग्रेसला अजूनही हे नाव मान्य नाही. कितीही नाव बदला लोक अमेठीला अमेठी म्हणूनच ओळखतील अशी दर्पोक्ती काँग्रेस प्रवक्ते मनिष तिवारी यांनी केली होती. महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचा पुढाकार करणाऱ्या कॉंग्रेसचे हे दुटप्पी धोरण कळत नाही. महाराष्ट्रात शाहू महाराजांचा आदर्श डोळयासमोर ठेवणाऱ्या कॉंग्रेसचा शाहू महाराजांच्या नावाचा एवढा विरोध का?? उत्तरप्रदेश मध्ये कॉंग्रेस प्रादेशिक राजकारण करत आहे हे खर आहे पण मग डी.एम.के , मनसे आणि युपी कॉंग्रेस मध्ये फरक तो काय?? खर तर राष्ट्रीय पक्ष असलेल्या कॉंग्रेसने राष्ट्रीय एकात्मतेचे आणि समानतेचे प्रतिक असलेल्या शाहू महाराजांचा आदर करत अमेठीचे बदललेले नाव स्वीकारले पाहिजे होते.

Sunday 29 January 2012

मणिपुरी निर्भयता

मणिपूर मध्ये काल ८२ टक्के मतदान झाले. मणिपूरने पुन्हा एकदा दाखवून दिल कि मणिपूरची साक्षरता केवळ कागदावर दाखविण्यासाठी नाही आहे. हिंसेच्या पार्श्वभूमीवर हे मतदान लोकशाही मजबूत करणार आहे. निवडणुकीतील हिंसेत ७ लोकांचा मृत्यू झाला. एका पोलिंग बुथवर हल्ला झाला यात एका १४ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आणि CRPF चा जवान शहीद झाला. सगळ्या कट्टरपंथी आणि दहशतवादी शक्तींनी मतदानाचा बहिष्कार करण्याचा फतवा काढला होता. मतदानाला जाणाऱ्या लोकांवर हल्याची धमकी दिली होती. जीवाला धोका असतानाही मणिपुरी जनतेने निर्भयपणे मतदान केले. 

अर्थात मणिपूरने प्रत्येक निवडणुकीत चांगल मतदान केलेल आहे. प्रचंड मतदान ही मणिपूरची परंपराच बनली आहे. २००७ च्या निवडणुकीत ८६ टक्के मतदान झाल होत. तशी मणिपूरची विधानसभा खूप जुनी आहे. १९४८ मध्ये मणिपूर देशाची स्वतंत्र विधानसभा अस्तित्वात होती. १९४९ मध्ये भारतीय सेनेने मणिपूरवर चाल केली आणि मणिपूरच्या राजाला अटक केली त्याला नजरकैदेत ठेवले आणि मणिपूर भारतात सामील झाला. भारतात सामील झाल्यावर १९६७ मध्ये पहिली निवडणूक झाली. मणिपूर मध्ये मानवी हक्कांची पायमल्ली होत असल्याचा आरोप असताना ही निवडणूक महत्वाची ठरते.

Friday 20 January 2012

लॉटरीचा बळी

फार वाईट वाटत ज्यावेळी अशा बातम्या कानावर येतात. भोपाळ मधील एका इंजिनीयरींग कॉलेजमधील निरोशन या श्रीलंकन मुलाने आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वी निरोशनच्या मोबाईलवर काही लाखांची लॉटरी जिंकल्याचा एस एम एस आला. घरची परिस्थिती गरीब असलेल्या निरोशनला फार आनंद झाला. त्याने कोणालाही न कळवता त्या एस एम एस पाठविणाऱ्या परदेशी लोकांशी संपर्क साधला. त्यांनी त्याला दोन लाख रुपये एका परदेशी खात्यात भरण्यास सांगितले. निरोशनने आता आपली सर्व स्वप्ने पूर्ण होतील या वेड्या आशेने आपल्या मित्रांकडून पैसे उधार घेऊन त्या परदेशी खात्यावर सर्व पैसे भरले. काही महिने उलटल्यानंतरही काहीच मिळाले नाही हे लक्षात येताच निरोशनने आत्महत्येचा निर्णय घेतला. 

ही खुपच दुखद घटना आहे पण मित्रांनो लोभ अतिशय वाईट असतो. सोप्या मार्गाने कधीही कोणी श्रीमंत होत नाही. कष्ट करावेच लागतात. जवळच्या मार्गाने मिळालेले यश दीर्घकाळ टिकत नाही. इंजिनीअरींग चा अभ्यास करणारा विद्यार्थीही अशा भूलथापांना बळी पडतो यापेक्षा दुर्दैवी ते काय. मित्रांनो तुम्हीही अशा लोकांपासून सावध राहा. कोणी ईमेल, एस एम एस किंवा फोनद्वारे तुम्हाला लॉटरी सारखी आमिषे देत असेल तर सर्वप्रथम आपल्या जवळच्या व्यक्तींना हे सांगा. बळी पडू नका आणि सगळ्यात महत्वाच प्रत्येक संकटातून मार्ग निघू शकतो, मार्ग काढला जावू शकतो. टोकाचे निर्णय घेवू नका. नेहमी तुमच्या जवळच्या व्यक्तींचा विचार करा. अशा घटनांना आळा घालण्यासाठी लोकजागृतीची गरज आहे. शेअर करा. 

Sunday 15 January 2012

Khanacademy.org




The Khan Academy is an organization on a mission. Not-for-profit with the goal of changing education for the better by providing a free world-class education to anyone anywhere.

All of the site's resources are available to anyone. It doesn't matter if you are a student, teacher, home-schooler, principal, adult returning to the classroom after 20 years, or a friendly alien just trying to get a leg up in earthly biology. The Khan Academy's materials and resources are available to you completely free of charge. 


Instapaper.com

Instapaper is a simple tool to save web pages for reading later. Instapaper facilitates easy reading of long text content. Instapaper allows you to easily save them for later, when you do have time, so you don’t just forget about them or skim through them.

8tracks.com


Listen for free to the best internet radio, handcrafted by people who know and love music. Or, share your own online mixtape, a streaming playlist with 8 or more tracks. Recently Time.com website listed 8tracks website as popular website in the world for music. You will find music8tracks is handcrafted internet radio. It offers a simple way for people to share and discover music through an online mix, a short playlist containing at least 8 tracks.

http://8tracks.com/ 

Saturday 14 January 2012

Happy Makar Sankrant

Happy Makar Sankrant, Lohiri, Pongal to all my friends.

Friday 13 January 2012

National shame


My mind is disturbed. 2 days back in Maharashtra 42-year-old Dalit woman was beaten, stripped and paraded naked in a village by upper caste people. First police refused to entertain her complaint when she approached them. The attitude of police personnel is highly condemnable. Very sad Incident and I think the incident is a national shame. We call our Maharashtra as Progressive Maharashtra. But I don't know where we are going. 

I strongly condemn this incident. I am not Dalit but still I can understand them. They are facing such acts for long years in India. Unless and until the Mentalities of people are changed nothing is possible. Everyone should come forward and condemn this act. Those who have done this, they should get punishment as early as possible. This incident shows that we don't have any right to call us civilized society specially when we fail to become human first.  

Tuesday 10 January 2012

रत्नदुर्ग वरून दिसणारा सुंदर नजारा ..

रत्नागिरी बस स्थानका पासून केवळ २ किमी अंतरावर रत्नदुर्ग आहे. तीन बाजुंनी पाणी आणि एकाबाजूने जमीन. तसा दुर्ग मोठा आहे. पूर्ण फिरण्यास बराच वेळ लागतो पण बालेकिल्ला फिरण्यास अर्धा तास पुरे होतो. बालेकिल्ल्यात भगवती देवीच मंदीर आहे. अलीकडेच दुर्गाच्या भिंतीची पुर्नबांधणी केली गेली आहे त्यामुळे चारही बाजुंनी फेरी मारता येते. दुर्गावरून समुद्राचे विहंगम दर्शन घडते. सूर्योदय आणि सूर्यास्त रत्नदुर्गवर जावूनच पहावा. संध्याकाळी फिरण्यासाठी स्थानिक रत्नागिरीकर मोठया प्रमाणावर येतात. मंगळवारी पर्यटक आणि भाविक गर्दी करतात. ५:३० ला मुख्य दरवाजा बंद होतो.




अधिक फोटो साठी क्लिक करा-->>  http://indianclicker.blogspot.com/

Wednesday 4 January 2012

To request ONE copy of Fedora DVD FREE


To request ONE copy of Fedora DVD or Live Media by mail You have to fill form which is available on fedora website. Fill all the details. Fedora will create ticket for you. Please provide correct address. 

DON'T CHANGE anything on ticket page. 

Just scroll down and press "Submit Ticket" at the bottom of the page. Make sure to use Universal Postal Union Standard Address including Postcode and Country.
Otherwise they will not accept your request!

ShareThis

Registered With