माझे ब्लॉगींग .....
तो सन २००७ डिसेंबर महिन्यातला शेवटचा आठवडा होता. मी नेहमीप्रमाणे इंटरनेटच्या मोहजालातून फेरफटका मारत होतो. सहज माझी नजर ब्लॉगवाणी या संकेतस्थळावर गेली. यापूर्वीही मी ब्लॉग्जबद्दल बरेच काही ऐकले होते पण ब्लॉग बनवण्याची इच्छा झाली नव्हती. मी माझ्या संकेतस्थळांच्या दुनियेतच खूश होतो. पण त्या दिवशी मला हरेकृष्णाजी हा ब्लॉग सापडला. ब्लॉग पाहून असे वाटले की मराठीत सर्वसमावेशक ब्लॉग आहेत. ते संख्येने कमी असले तरी आहेत. आपणही एखादा सर्वसमावेशक ब्लॉग तयार करावा, ज्यावर आपले विचार मांडता येतील. मराठी ब्लॉग म्हणजे कविता आणि कथा असेच मला वाटत होते पण काही ब्लॉग पाहून माझे विचार बदलून गेले.
या गोष्टीला आज पाच महिने पूर्ण होत आहेत. माझी दिनचर्या पूर्ण बदलली आहे. सकाळच्या चहाबरोबर आता ब्लॉगवाणी किंवा मराठीब्लॉग्ज डॉट नेट लागतो.
कोणी काय लिहीलयं याची उत्सुकता.
खट्टा मिठा मध्ये आज कुठला इतिहास दिला आहे?
प्राजक्ताने आज कोणत्या पाककलेबद्दल लिहीले आहे?
आज मोरपीसमध्ये नविन काय आहे?
आज महाभारतातील कोणती कथा वाचायला मिळणार?
यासगळयाचीच उत्सुकता. माझे जिवन ब्लॉगमय झाले आहे. दिवसातून २ तास मी इतरांचे ब्लॉग वाचतो. वाचनातून बरेच काही शिकता येते. गंभीर ,मनोरंजक, हलकेफुलके, राजकारण, क्रिडा, चित्रपट, आरोग्यविषयक, पाककला काय नाही ब्लॉग्जच्या दुनियेत ते सांगा? कंटाळा आला की हास्यमेव जयते आहेच मनोरंजनासाठी. अगदी ऑनलाइन कादंबरीही वाचता येते. केवळ कॉपी-पेस्ट ब्लॉगही आहेत पण ते कधीच लोकप्रिय होवू शकणार नाही. शेवटी नवनिर्माण आणि कल्पकताच तग धरते हे लक्षात असू द्या.
मित्रांनो आपल्या ब्लॉगींगचा धसका बऱ्याच जणांनी घेतला आहे. जास्तीत जास्त ब्लॉगर्स हे पक्षनिरपेक्ष लेखन करतात (अपवाद काही ब्लॉगर्सचा जे तळी उचलून लिखाण करतात.) आणि त्यामुळे सत्य परिस्थिती समोर येते. त्यामुळे बऱ्याच जणांचे धाबे दणाणले. रस्ताचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम असो किंवा नेत्यांची होर्डींग्ज असोत ब्लॉगर्स नेहमीच हे प्रश्न मांडतात. पण काही प्रमाणात आपल्यालाही स्वतः ठरवलेली आचारसंहिता पाळणे गरजेचे ठरते. धर्मांध ब्लॉग्ज तुम्ही पहातच असाल. अत्यंत स्फोटक आणि चिथावणीखोर विचार या ब्लॉग्जमध्ये आहेत. भारतीय संघराज्याच्या ,भारतीय ध्वजाच्या, भारतीय राष्ट्रगीताच्या आणि अस्मितेच्या विरोधात लिहीणे हा एक प्रकारचा देशद्रोहच आहे.
मित्रांनो आपल्या ब्लॉगींगचा धसका बऱ्याच जणांनी घेतला आहे. जास्तीत जास्त ब्लॉगर्स हे पक्षनिरपेक्ष लेखन करतात (अपवाद काही ब्लॉगर्सचा जे तळी उचलून लिखाण करतात.) आणि त्यामुळे सत्य परिस्थिती समोर येते. त्यामुळे बऱ्याच जणांचे धाबे दणाणले. रस्ताचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम असो किंवा नेत्यांची होर्डींग्ज असोत ब्लॉगर्स नेहमीच हे प्रश्न मांडतात. पण काही प्रमाणात आपल्यालाही स्वतः ठरवलेली आचारसंहिता पाळणे गरजेचे ठरते. धर्मांध ब्लॉग्ज तुम्ही पहातच असाल. अत्यंत स्फोटक आणि चिथावणीखोर विचार या ब्लॉग्जमध्ये आहेत. भारतीय संघराज्याच्या ,भारतीय ध्वजाच्या, भारतीय राष्ट्रगीताच्या आणि अस्मितेच्या विरोधात लिहीणे हा एक प्रकारचा देशद्रोहच आहे.
जेवण म्हणजे मराठी माणसाचा विक पॉईंट. रोजरोज नवनविन पाककला शिकवणाऱ्या प्राजक्ता आणि रुचिरा यांचे ब्लॉग कधी सोबती बनले कळलेच नाही. चकलीनेही बरच काही शिकवलं. गेला पूर्ण आठवडा या ब्लॉग्जच्या दुनियेपासून दूर होतो पण प्रत्येक क्षणाला आपल्या सर्वांची आठवण येत होती. कधी एकदा परीक्षा संपते याचीच वाट बघत होतो. प्रतिक्षा संपली. लिखाण सुरु.......
- वामन परुळेकर
Technorati Profile
19 comments:
मस्तच ! आपल्या या लेखामुळे मला सर्व टॉप ब्लॉग्जची माहिती मिळाली.
- प्रीतम माने
ब्लॉग्ज लिहून काही साध्य होते का?? उगीच वेळ व्यर्थ...
प्रीतम धन्यवाद..
to Anonymous
मी बिननावाच्या व्यक्तिंना प्रतिक्रिया देत नाही...
Dear Waman,
Thanks.
प्रत्येक फुलाने अपुल्या परि उमलावे
सुगंध देवून सर्वा उल्हासित करावे
गुलाब जाई जुई आणि मोगरा
घाणेरी लाजेरी कण्हेरी आणि धत्तूरा
नाविन्य असते प्रत्येक कृतिचे
निर्मिती हे एकच लक्ष निसर्गाचे
नको म्हणू रे मनुजा!
हेच बरे वा तेच बरे
जा तुही करीत निर्मिती
मात्र
करू नको कॉपी दुसऱ्याची
सामंत
सामंत,
कविता छान आहे, पण ही कविता तुम्ही येथे कोणत्या अर्थाने दिली आहे हे कळत नाही.ते कृपया स्पष्ट करावे ही विनंती.
सामंत,
कविता छान आहे, पण ही कविता तुम्ही येथे कोणत्या अर्थाने दिली आहे हे कळत नाही.ते कृपया स्पष्ट करावे ही विनंती.
आपला पोस्ट वाचता वाचता आपलं एक वाक्य वाचलं
"केवळ कॉपी-पेस्ट ब्लॉगही आहेत पण ते कधीच लोकप्रिय होवू शकणार नाही. शेवटी नवनिर्माण आणि कल्पकताच तग धरते हे लक्षात असू द्या."
हे आपलं वाक्य वाचताना मनात आलं की किती सत्य आहे नवनिर्माण आणि कल्पकतेच्या क्षमते मधे.
खरं म्हणजे निर्मिती ही निसर्गाची देणगी आहे.आणि निसर्ग कधीही काहीही कॉपी पेस्ट करीत नाही पण आपण मानव कशासाठी ह्या क्षमतेचा दुरूपयोग करतो.
आपला ब्लॉग सुद्धा असंच एक सुंदर फूल आहे आणि आपल्या ब्लॉगच्या सुरवातीला एक सुंदर फूलपाखरूं फुलातल्या सुगंधाला आकर्षित होवून वर बसून एंज्यॉय
करीत आहे ह्याचा विचार मनात येवून कविता सुचली
फूल आणि ब्लॉग मधे मला साम्य दिसलं आणि ही कविता सुचली एव्हडंच.कुठचही फूल जसं सुदर असतं तसंच कुठचाही ब्लॉग तसाच असतो.फक्त कुणी कॉपी पेस्ट करू नये हाच माझा शेवटी कवितेत संदेश आहे.
आपण केलेल्या माझ्या कवितेच्या प्रशंसे बद्दल धन्यवाद
सामंत
सामंतजी,
खरच अप्रतिम कविता आहे. कविता ज्यावेळी अशाप्रकारे सुचते ना त्यावेळी ती आतून आलेली हाक असते. मी आपल्या अन्य कविताही वाचल्या आहेत. "खुषी न मिळता मिळते रुसणे" ही कविताही मला आवडली. पण वर्डप्रेसवर अकाउंट नसल्यामुळे कमेंट देता येत नाही.
असेच लिहीत राहा..
धन्यवाद
नमस्कार वामनजी,
स्पष्टीकरणाने आपल्या शंकेचं निरंसन झालं हे पाहून बरं वाटलं.माझ्या कविता आपण वाचता हे वाचून आनंद झाला.मी पण कोकणातला. आपल्या ब्लॉगवरच्या कोकणातल्या फोटोने मी आणि माझी पत्नी वेडीपिसी होतो.आता ह्या वयात दहा हजार मैलावरून अशिच मनाची समाधानी करून घ्यावी लागते बघा.
ते शेतातले कुणगे,ती भात शेती,ती ढवळ्या पवळ्या बैलांची जोडी.तो समुद्र,ती देवाची मंदीरं फोटोत पाहून मन तृप्त होतं
आपण परुळेकर तसेच आम्ही ही सामंतपरुळेकर,पण सामंत नांव लावतो.
विषय डोक्यात आल्यावर मी मालवणीत जीव ओतून लिहितो.
आपले कोकणचे लोक कुठे कुठे नाहित म्हणून सागू.
माझ्या "इलो रे इलो! कोकणातला पाऊस " हा पोस्ट वाचून टोकयो आणि सौदिअरेबियातून ईमेल्स आल्या.
असंच कोकणातलं काहीना काही लिहित जा असंही कळवितात.
सांगायचा उद्देश असा आपण म्हणता ते अगदी खरं आहे."ती आतून आलेली हांक आहे" ती नाही दडपवता येत.ह्या तुमच्या सारख्या सर्वांच्या ब्लॉगसला भेट देवून खूप आनंद होतो.म्हणूनच मी बेधडक आपला पोस्ट वाचून आपल्या पोस्टच्या कॉमेंट्स मधे कवितेने टिप्पणी केली.खरं लिहायला लक्षात कशाला ठेवलं पाहिजे नाही काय.
आपली टिप्पणी माझा पोस्ट वाचून माझ्या ईमेलवर देऊ शकता.नांव रजिस्टर करायचं झंझट नाही.
आपल्या प्रशंसे बद्दल धन्यवाद
सामंत
धन्यवाद श्रीकृष्ण सामंतजी. मी लवकरच वर्डप्रेसवर अकाउंट तयार करेन म्हणतोय.
रा. रा. वामनराव,
आज तुमच्या ब्लॉगमध्ये खट्टामिठाचा उल्लेख वाचला आणि खरं सांगतो, खूप बरं वाटलं. यातले बरेचसे लेख मी माझ्या डायरीत लिहून ठेवले होते. येता जाता मित्रांना सांगायचो त्याबद्दल. मग वाटलं ते ब्लॉगवर का टाकू नये?
या ब्लॉगमधील लेखांना कोणी हिंग लावून विचारील की नाही अशी शंका आधीपासूनच मनात होती. पण धीर केला. पण त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
हे लेख तसे माझे नव्हेत. कुठंकुठं वाचलेलं त्यात उतरवलं येवढंच माझं कर्तृत्व. गेले दोनेक महिने त्यात काही लिहिण्यास सवडच मिळाली नाही. पण आज तुम्ही या ब्लॉगचा उल्लेख केला आणि मला वाटू लागलं की पुन्हा एकदा हरिओम करावा...
धन्यवाद.
खट्टा-मिठा माझा आवडता ब्लॉग आहे. तुमच्या या ब्लॉगमुळे बऱ्याच जणांचे डोळे उघडले असतील. या ब्लॉगमुळे माझ्या ज्ञानात बरीच भर पडली. पुन्हा एकदा सुरुवात कराच. मी आपल्या लेखनाची आतुरतेने वाट पाहत आहे.
- वामन
सुरेख लिहिले आहे. असेच लिहीत रहा.
धन्यवाद केशवानंद.
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?
मनाशी मनं आधी जुळवायची कशाला?
जुळलेली मनं पायदळी मग तुडवायची कशाला?
कधि फ़ुलपाखरु होऊन बागडणा-या मनास
काट्यांतच मग खुडावं लागतं.....
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?
surekh...
mazi post wachata wachata jar kunala kavita suchat asel tar mazyasathi ti aanadachi gost aahe..
phar chan kavita kelit..
Dhanyavad
Aapala - Waman
Post a Comment