फार वाईट वाटत ज्यावेळी अशा बातम्या कानावर येतात. भोपाळ मधील एका इंजिनीयरींग कॉलेजमधील निरोशन या श्रीलंकन मुलाने आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वी निरोशनच्या मोबाईलवर काही लाखांची लॉटरी जिंकल्याचा एस एम एस आला. घरची परिस्थिती गरीब असलेल्या निरोशनला फार आनंद झाला. त्याने कोणालाही न कळवता त्या एस एम एस पाठविणाऱ्या परदेशी लोकांशी संपर्क साधला. त्यांनी त्याला दोन लाख रुपये एका परदेशी खात्यात भरण्यास सांगितले. निरोशनने आता आपली सर्व स्वप्ने पूर्ण होतील या वेड्या आशेने आपल्या मित्रांकडून पैसे उधार घेऊन त्या परदेशी खात्यावर सर्व पैसे भरले. काही महिने उलटल्यानंतरही काहीच मिळाले नाही हे लक्षात येताच निरोशनने आत्महत्येचा निर्णय घेतला.
ही खुपच दुखद घटना आहे पण मित्रांनो लोभ अतिशय वाईट असतो. सोप्या मार्गाने कधीही कोणी श्रीमंत होत नाही. कष्ट करावेच लागतात. जवळच्या मार्गाने मिळालेले यश दीर्घकाळ टिकत नाही. इंजिनीअरींग चा अभ्यास करणारा विद्यार्थीही अशा भूलथापांना बळी पडतो यापेक्षा दुर्दैवी ते काय. मित्रांनो तुम्हीही अशा लोकांपासून सावध राहा. कोणी ईमेल, एस एम एस किंवा फोनद्वारे तुम्हाला लॉटरी सारखी आमिषे देत असेल तर सर्वप्रथम आपल्या जवळच्या व्यक्तींना हे सांगा. बळी पडू नका आणि सगळ्यात महत्वाच प्रत्येक संकटातून मार्ग निघू शकतो, मार्ग काढला जावू शकतो. टोकाचे निर्णय घेवू नका. नेहमी तुमच्या जवळच्या व्यक्तींचा विचार करा. अशा घटनांना आळा घालण्यासाठी लोकजागृतीची गरज आहे. शेअर करा.
No comments:
Post a Comment