Sunday, 29 January 2012

मणिपुरी निर्भयता

मणिपूर मध्ये काल ८२ टक्के मतदान झाले. मणिपूरने पुन्हा एकदा दाखवून दिल कि मणिपूरची साक्षरता केवळ कागदावर दाखविण्यासाठी नाही आहे. हिंसेच्या पार्श्वभूमीवर हे मतदान लोकशाही मजबूत करणार आहे. निवडणुकीतील हिंसेत ७ लोकांचा मृत्यू झाला. एका पोलिंग बुथवर हल्ला झाला यात एका १४ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आणि CRPF चा जवान शहीद झाला. सगळ्या कट्टरपंथी आणि दहशतवादी शक्तींनी मतदानाचा बहिष्कार करण्याचा फतवा काढला होता. मतदानाला जाणाऱ्या लोकांवर हल्याची धमकी दिली होती. जीवाला धोका असतानाही मणिपुरी जनतेने निर्भयपणे मतदान केले. 

अर्थात मणिपूरने प्रत्येक निवडणुकीत चांगल मतदान केलेल आहे. प्रचंड मतदान ही मणिपूरची परंपराच बनली आहे. २००७ च्या निवडणुकीत ८६ टक्के मतदान झाल होत. तशी मणिपूरची विधानसभा खूप जुनी आहे. १९४८ मध्ये मणिपूर देशाची स्वतंत्र विधानसभा अस्तित्वात होती. १९४९ मध्ये भारतीय सेनेने मणिपूरवर चाल केली आणि मणिपूरच्या राजाला अटक केली त्याला नजरकैदेत ठेवले आणि मणिपूर भारतात सामील झाला. भारतात सामील झाल्यावर १९६७ मध्ये पहिली निवडणूक झाली. मणिपूर मध्ये मानवी हक्कांची पायमल्ली होत असल्याचा आरोप असताना ही निवडणूक महत्वाची ठरते.

No comments:

ShareThis

Registered With