केजरीवाल
अतिशय अराजक आहेत. त्यांनी मुख्यमंत्री झाल्यावर एखाद्या सभ्य
राजकारण्यासारख वर्तन ठेवल पाहिजे. दिल्लीत बलात्कार होतायत, सेक्स रेकेट
चालवल जातय ?? ड्रग्ज माफिया थैमान घालत आहेत ?? पोलीस ऐकत नाहीत? मग काय
झाल ? इतर राज्यात होत नाहीत का? या सगळ्यावर एक चौकशी आयोग नेमायचा आणि
मस्त AC लावून घरी झोपायचं. रस्त्यावर झोपायची काय गरज? इतर राजकारणी
लोकांचा तरी विचार करायचा. ३-४ महिन्यात रिपोर्ट येईल त्यावेळी
जमल तर कारवाई होईलच ना. केजरीवाल जरा अतीच करतात. काय गरज होती त्या
भारतीना त्या वस्तीत जायची. गेली अनेक वर्षे तिकडे कोणी गेला का? फार तर
फार सामान्य जनता, पुजारी तक्रारी लिहितील. अशा तक्रारी कचऱ्याच्या टोपलीत
फेकल्या जातील. जे काही चाललंय ते योग्यच चाललाय. उगीच यांच नाटक. म्हणे
पोलीस कारवाई करत नाही? दिल्ली पोलिसांवर काहीही आरोप करायचे? देशात
सगळ्यात जास्त गुन्हे घडले म्हणून काय झाल? ते तर होतच असतात. बडे बडे शहरो
मे छोटी छोटी चीजे होती रहती है....उगाच मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष
घालू नये. मुख्यमंत्री तुम्ही एखाद्या चित्रपटाच्या रिलीज पार्टीला जा
नाहीतर परदेश दौऱ्यावर जा ना. मुख्यमंत्री पदाला काही शोभा आहे की नाही.
हे अजिबात खपवून घेतल जाणार नाही.
No comments:
Post a Comment