महाराष्ट्रातील महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. १० पैकी ६ महानगरपालिका कॉंग्रेस आघाडीने जिंकल्या. मुंबईत सेनेन खरच करून दाखवल. नाशिकात मनसेला प्रचंड यश मिळालय. तसेच महाराष्ट्रातील ग्रामीण भागावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपली पकड कायम ठेवत २० जिल्हा परिषदांवर विजय मिळवला आहे. आघाडीचे ९०० उमेदवार निवडून आलेत. नारायण राणे यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आणि अजित पवारांना चोख उत्तर दिले. गोपीनाथ मुंडे यांनी देखील आपल्या जागा राखल्या. खरा फटका बसलाय तो भुजबळ आणि विखे पाटील यांना. मनसेने पुणे, नाशिक आणि नगर महानगरपालिकेत अनपेक्षित यश मिळवलं. पंचायत समिती निवडणुकांचे निकाल बघितल्यावर एकच गोष्ट लक्षात येते कि ग्रामीण महाराष्ट्रात जे संघटन कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीजवळ आहे त्या संघटनाला सेनेजवळ पर्याय नाही. याही निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे अण्णा हजारे यांचा कोणताही प्रभाव दिसला नाही.
Friday, 17 February 2012
Tuesday, 14 February 2012
तेरेखोल किल्ला
Posted by
Waman Parulekar
at
21:41
तेरेखोल किल्ला पेडणे तालुक्याचा (उत्तर गोवा जिल्हा) भाग आहे. १७ व्या शतकात सावंतवाडी संस्थानचे महाराज खेम सावंत भोसले यांनी तेरेखोल किल्ला बांधला. १७६४ साली हा किल्ला पोर्तुगीजांनी ताब्यात घेतला. तेरेखोल गावाजवळील रेडी जरी वेंगुर्ला तालुक्यात येत असलं तरी हा किल्ला मात्र सध्या गोवा सरकारच्या ताब्यात आहे. सध्या किल्यात एक आलिशान हेरिटेज हॉटेल बांधण्यात आल असून किल्यात प्रवेश निवडक लोकांनाच मिळतो. तेरेखोल पाहण्यासाठी वेंगुर्ला आणि सावंतवाडी बसस्थानकावरून बसेस उपलब्ध आहेत. गोव्यातून जाण्यासाठी केरी मार्गे यावे लागेल. विशाल तेरेखोल नदी पार करण्यासाठी फेरी बोट उपलब्ध आहेत. केरी (गोवा) - तेरेखोल आणि पाल्ये (गोवा) - आरोंदा (वेंगुर्ला) फेरीबोट सेवा सतत सुरु असते. केरी तून म्हापसा आणि पेडणे बसेस सतत उपलब्ध असतात.
जवळची प्रेक्षणीय स्थळे
१) तेरेखोल नदी
२) तेरेखोल किल्ला
३) रेडी गणपती मंदीर
४) टाटा इस्पात कंपनी रेडी
५) आरोंदा
६) तेरेखोल हेरिटेज रिसोर्ट, गोवा सरकार
७) तेरेखोल बीच
८) शिरोडा बीच
९) आरवली वेतोबा (दक्षिण काशी)
१०) उभादांडा बीच
११) वेंगुर्ला
१२) केरी बीच (पेडणे)
फेसबुकवरील खोटा प्रचार
Posted by
Waman Parulekar
at
00:46
हा एक नवीन खोटा प्रचार. हा फोटो बघून मला धक्काच बसला. एखाद्या पक्षाविरुद्ध प्रचार करताना लोक एवढ्या खोट्या गोष्टी पसरवतील आणि त्याच्यावर आपले फेसबुककर एवढा विश्वास ठेवतील अस स्वप्नातही वाटल नव्हत. मित्रांनो डोळे झाकून शेअर करण सोडा. आपण नक्की काय शेअर करतोय याचा विचार करा. सत्यता पडताळून पहा. किती दिवस तुम्ही फसत राहणार. स्वतःच्या डोक्याचा वापर करा, एकाच संकुचित विचारधारेला वाहून घेवू नका. त्या ऐवजी डोळे उघडून जगाकडे पहा. मुद्देसूद टीका करणे वेगळ आणि टिंगलटवाळी, विकृत प्रचार करणे वेगळ. आज निदान माझ्या दहा मित्रांच्या Wall वर ही पोस्ट मला दिसली.

Monday, 13 February 2012
Saturday, 11 February 2012
मी आणि माझे पूर्वज
Posted by
Waman Parulekar
at
13:27
पुरातन मंदीरे हे त्या त्या भागातल्या इतिहासाची स्मारकं असतात. कोकणातल्या प्रत्येक मंदिरात मूळपुरुष आणि ज्यांनी ते गाव वसवल त्यांच्या आठवणी प्रीत्यर्थ एक खास जागा राखून ठेवलेली असते. त्याव्यतिरिक्त मंदीरांची अंतर्गत रचना, मूर्तीकला आणि स्थापत्यकला ही माझ्या आकर्षणाची केंद्रे आहेत. ज्या काळात ही मंदिरे बांधली गेली त्याकाळातील स्थापत्यकला बघता येते. मंदिराव्यतिरिक्त इतर कोणतीही ऐतिहासिक वास्तू आपल्याकडे कोकणात एवढी जपून ठेवली जात नाही. साहजिकच त्यामुळे मला मंदिरे फिरायला आवडतात. अर्थात केवळ मंदिरात गेल्यामुळे मी सनातनी होत नाही किंवा मंदिरात जर भेदभावाची वागणूक दिली जात असेल तर त्यालाही माझा पाठींबा मुळीच नाही. मला कोकणातली मंदिरे जेवढी दर्शनीय वाटतात तेवढीच चर्च देखील. तसेच ईश्वर, अल्लाह आणि ख्रिस्त माझ्यालेखी एकच.
आता प्रश्न राहिला माझ्या पूर्वजांचा तर त्यांच्या सनातनी असण्याने माझ्या विचारांवर कोणताही परिणाम होत नाही. मला ज्ञात मोठी उदाहरणे सनातनी नसलेल्या पुर्वजांची आहेत. माझे पूर्वज माझे पणजोबा सुभेदार मेजर विष्णू स. परुळेकर यांनी देवळात कधी पाउल ठेवल नव्हत तशी त्यांनी प्रतिज्ञा केली होती. त्यांचा देवावर विश्वास होता पण मंदिरावर नाही. सुधारणावादी आणि पुरोगामी अशी त्यांची ओळख होती. अर्थात त्याला कारण मंदिरात त्याकाळी बहुजनांना दिल्या जाणाऱ्या वागणूकीबद्दल त्यांच्या मनात चीड होती.
निवतीचे किल्लेदार बाळोजी नाईक परुळेकर यांनी समाजसुधारणेची मोहीम हाती घेतली होती. तेही धर्मिक वृत्तीचे होते पण सनातनी मुळीच नव्हते. नंतरच्या काळात सुभेदारांचे नातेवाईक असलेले डॉ. रायसाहेब रामजी खानोलकर यांनी जी समाजसुधारणा केली त्याला तोड नाही. बहुजनांच्या शिक्षणासाठी शाळा, हायस्कूल बांधले. धर्मशाळा बांधली. क्वेटा हिंदू परिषदचे ते अध्यक्ष होते. अनेक अशी कामे केली जी संपूर्ण मानवी समाजाच्या हिताची होती. डॉ. रायसाहेब रामजी खानोलकर हे संस्कृतचे पंडीत होते. रामकृष्ण मिशनचे सदस्य होते. माझे पूर्वज धार्मिक होते पण सनातनी नव्हते. हे सगळ लिहिण्यास कारण की नरेशजी यांच्या मनात जी शंका होती ती दूर करणे. कृपया गैरसमज नको. धन्यवाद..
Wednesday, 8 February 2012
शाहू महाराजांचे विस्मरण ?
Posted by
Waman Parulekar
at
20:11
मायावतींनी अमेठीच नाव बदलून छत्रपती शाहूमहाराज नगर अस ठेवल आहे. मात्र
कॉंग्रेसला अजूनही हे नाव मान्य नाही. कितीही नाव बदला लोक अमेठीला अमेठी
म्हणूनच ओळखतील अशी दर्पोक्ती काँग्रेस प्रवक्ते मनिष तिवारी यांनी केली
होती. महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचा पुढाकार करणाऱ्या कॉंग्रेसचे हे
दुटप्पी धोरण कळत नाही. महाराष्ट्रात शाहू महाराजांचा आदर्श डोळयासमोर
ठेवणाऱ्या कॉंग्रेसचा शाहू महाराजांच्या नावाचा एवढा विरोध का??
उत्तरप्रदेश मध्ये कॉंग्रेस प्रादेशिक राजकारण करत आहे हे खर आहे पण मग
डी.एम.के , मनसे आणि युपी कॉंग्रेस मध्ये फरक तो काय?? खर तर राष्ट्रीय
पक्ष असलेल्या कॉंग्रेसने राष्ट्रीय एकात्मतेचे आणि समानतेचे प्रतिक
असलेल्या शाहू महाराजांचा आदर करत अमेठीचे बदललेले नाव स्वीकारले पाहिजे
होते.
Subscribe to:
Posts (Atom)