Friday, 31 December 2021

83 Movie Review


What a movie..... fantabulous.... excellent..... wonderful....😊🤩 My review 5/5

Watched and experienced the journey of champions.

८३ हा क्रिकेट वर आधारित चित्रपट असल्यामुळे विचार करत होतो की पुष्पा पाहूया. पण काही review वाचले आणि ठरवलं की ८३च पाहायचा आणि निर्णय अगदी योग्य ठरला. ८३ मध्ये कपिल च्या संघाने वर्ल्ड कप जिंकला हे जेव्हा पासून कळायला लागलं तेव्हा पासून माहिती होत. पण जन्मा पूर्वीची घटना असल्यामुळे त्याच scale माहिती नव्हतं. नेमकं काय घडलेलं, त्यावेळी भारतात परिस्थिती काय होती किंवा भारतीय संघाची स्थिती काय होती या गोष्टी फारश्या माहिती नव्हत्या. ८३ या चित्रपटात हे सगळ आहे. भावना प्रधान, देशभक्तीचे ओतप्रोत भरलेला आणि वास्तव जशास तस दाखवणारा हा चित्रपट आहे. सर्वच कलाकारांनी उत्तम अभिनय केलाय. एक क्षण हा चित्रपट बोअर करत नाही. Cinematography पण फार सुंदर आहे विशेषतः जेव्हा पहाटे लॉर्ड्स वर तिरंगा फडकतो. प्रत्येक सीन पुन्हा तयार करताना प्रचंड मेहनत घेतली आहे. कारण बऱ्याच सिन नंतर त्याचा ओरिजनल सिन देखील स्क्रीन वर दाखवला जातो आणि तो हुबेहूब झालेला दिसतो. बऱ्याच दिवसांनंतर असा चित्रपट आला आहे. भाग मिल्खा भाग, धोनी, मेरिकॉम नंतर बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर हिंदी मध्ये असा चित्रपट आलाय. सेमी फायनल आणि फायनल च्या अनेक सीन मध्ये आमच्या शो दरम्यान लोकांनी टाळ्या वाजवल्या. लगान पाहताना तसा experience आम्हाला आलेला. मल्टिप्लेक्स मध्ये टाळ्या अनुभवायला येत नाहीत 😀😀😀 पण आज आम्ही अनुभवल्या. आमच्या मागे बसलेली आजी आणि त्या पिढी मधील इतर आज आम्ही भावूक होताना पाहिले. क्रेडिट आल्यानंतर सुद्धा लोक हलत नव्हती. कपिल ने जे लास्ट स्पीच दिलं ते सर्वांनी ऐकल. निगेटिव्ह रिव्ह्यू कडे अजिबात लक्ष देवू नका जा आणि चित्रपट पहा. आजच्या पिढीला आणि येणाऱ्या पिढीला ८३ मध्ये आपल्या क्रिकेट संघाने काय भीम पराक्रम गाजवला आहे हे समजणं खूप गरजेचं आहे. Hats off to entire team of  83 👍👍👍

- वामन परुळेकर

ShareThis

Registered With