Tuesday 26 February 2008

देशप्रेमी लियांडर पेस

तो ज्यावेळी मैदानात असतो त्यावेळी प्रत्येक क्षणाला भारताचे प्रतिनिधित्व करत असतो. खेळताना तो देशासाठी खेळतोय याचा प्रत्यय त्याचा प्रत्येक सामना बघितल्यानंतर येतोच. असा आपला टेनिसपटू लियांडर पेस नेहमीच देशप्रेमाने भारावून गेलेला असतो.

ह्या सगळयाचा उल्लेख करायचे महत्त्वाचे कारण म्हणजे सद्या भारतीय टेनिस क्षेत्रात उद् भवलेला वाद. खेळाडुंचा म्हणे लियांडरवरचा विश्वास उडालाय. या खेळाडुंना लियांडर कप्तान म्हणून नको आहे. तो हुकूमशाह सारखा वागतो असे या सहखेळाडूंना वाटते.

खर तर हा वैयक्तीक स्वरुपाचा वाद असावा पण त्यात पेस वर करण्यात आलेले आरोप निषेधास पात्र आहेत. देशासाठी जिवाचे रान करुन खेळणाऱ्या या महान टेनिसपटूवर असे आरोप फक्त आपल्याच देशात होउ शकतात.

डेव्हिसकप असो वा दोहा आशियाई खेळ पेसची जिद्द आणि देशप्रेम अतुलनिय आहे. अशा या महान भारतीय व्यक्तीस माझा सलाम.

आगे बढो पेस हम तुम्हारे साथ है ।

-वामन परुळेकर

3 comments:

HAREKRISHNAJI said...

yes. We are with you

Prashant Upasani said...

धन्यवाद वामन परुळेकर. तुम्हाला एस सी जे पी साठी कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर जरुर सांगा..
email: upasanip@yahoo.com
- उपास (मायबोली)

Waman Parulekar said...

धन्यवाद प्रशांत , आपण दिलेली माहिती मला उपयोगी पडेल. आपण माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

ShareThis

Registered With