हा एक नवीन खोटा प्रचार. हा फोटो बघून मला धक्काच बसला. एखाद्या पक्षाविरुद्ध प्रचार करताना लोक एवढ्या खोट्या गोष्टी पसरवतील आणि त्याच्यावर आपले फेसबुककर एवढा विश्वास ठेवतील अस स्वप्नातही वाटल नव्हत. मित्रांनो डोळे झाकून शेअर करण सोडा. आपण नक्की काय शेअर करतोय याचा विचार करा. सत्यता पडताळून पहा. किती दिवस तुम्ही फसत राहणार. स्वतःच्या डोक्याचा वापर करा, एकाच संकुचित विचारधारेला वाहून घेवू नका. त्या ऐवजी डोळे उघडून जगाकडे पहा. मुद्देसूद टीका करणे वेगळ आणि टिंगलटवाळी, विकृत प्रचार करणे वेगळ. आज निदान माझ्या दहा मित्रांच्या Wall वर ही पोस्ट मला दिसली.
सत्य हे आहे की लुईस ब्रेल हा कोणी इटालियन राजा नसून तो जगप्रसिद्ध ब्रेल लिपीचा जनक आहे. ब्रेल लिपीचा वापर अंध लोक लिहिण्या-वाचण्यासाठी करतात. पेशाने तो एक प्राध्यापक आणि संगीतकार होता. त्याचा जन्म आणि मृत्यू दोन्ही फ्रांस या देशात झाले. ब्रेलच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी म्हणजे १८५४ मध्ये फ्रांसने ब्रेल लिपीचा अधिकृतपणे स्वीकार केला. १८७३ च्या अंध शिक्षकांच्या जागतिक परिषदेनंतर ब्रेल लिपीचा प्रसार मोठया प्रमाणात युरोपात झाला. १९१६ मध्ये अमेरिकाने ब्रेल लिपीचा स्वीकार केला आणि १९३२ मध्ये इंग्लिश भाषेकरिता ब्रेल लिपी ठरविण्यात आली. मानवतेला फार मोठ योगदान देणाऱ्या ब्रेलची दखल जगातल्या सर्वच देशांनी घेतली. युरोपियन संघाने दोन विशेष नाणी चलनात आणली. अमेरिकेने एक डॉलरच्या नाण्यावर ब्रेलची दखल घेतली. बेल्जिअम, ईराण, चीन, इटली या देशांनीही ब्रेलचा फोटो असलेली नाणी चलनात आणून ब्रेलचा मरणोपरांत सन्मान केला. २००९ साली लुईस ब्रेल यांच्या २०० व्या जयंतीचे औचित्य साधून भारत सरकारनेही दोन रुपयाचे नाणे चलनात आणले. तोच हा फोटो. त्याचा वापर काही विकृत लोक प्रचारासाठी करत आहेत. कृपया जागे व्हा आणि अश्या समाजासाठी स्वत: आयुष्य वाहिलेल्या लोकांबद्दल खोटी माहिती पसरविणाऱ्या पोस्ट शेअर करू नका.
No comments:
Post a Comment