Sunday, 11 December 2011

अवलिया

काल संध्याकाळी रुद्र हॉटेल मध्ये एका परदेशी व्यक्तीची भेट झाली. अगदी योगायोग. ती व्यक्ती हॉटेल मध्ये आली त्यावेळी मी रॉयल कॉकटेलवर ताव मारत होतो. त्याला वेटरने हिंदीत विचारले "क्या चाहिये? ". तो गडबडला दोन मिनिट दोघांनाही काही कळल नाही. मग त्याने मेनू कार्ड मागीतल तर त्यावर सगळ त्याला न कळण्यासारख. मग त्याने माझ्या कॉकटेल कडे बोट दाखवून Give me this सांगीतल. वेटर अगदीच नवीन पोरगा होता त्याला तेही नाही कळल. तसा तो व्यक्ती नमस्कार करत पुढे आला आणि माझ्याशी बोलू लागला. "hey i want that which is ur eating. is ther alcohol in this drink. i dont want alcohol" त्याची इंग्लीशही जेमतेम होती. मी वेटरला मराठीत कॉकटेल आणायला सांगीतल. मला कुतूहल वाटल त्या व्यक्ती बद्दल. आमच्या वेंगुर्ल्यात आणि गोव्यात येणारी बरीच परदेशी मंडळी alcohol मध्ये interested असतात आणि हे महाशय नको म्हणत होते. 
 
मी त्यांना विचारल तुम्ही कुठून आलात वगैरे. बोलण्यातून कळल की ते डॉक्टर थॉमस होते. स्वीडन मध्ये human psychology वर रिसर्च करत आहेत. त्यांना भारत खूप आवडतो. मगाशी घडलेल्या त्या प्रसंगाचा उल्लेख करून ते म्हणाले की मी स्वीडनचा माझी इंग्लीश जेमतेम कधीकधी मी गावांमध्ये जातो त्यावेळी केवळ खाणाखुणा करून मी लोकांशी संपर्क साधतो. हाच तर माझा व्यवसाय आहे लोकांना समजून घेणे त्यांच्याशी संपर्क साधणे. बोलता बोलता ते एक गोष्ट आवर्जून बोलले की मला भारतात आणि स्वीडनमध्ये खूप मोठा फरक जाणवतो. तो म्हणजे येथे लोकांना बोलायला वेळ आहे. हसायला वेळ आहे. लोकांची विचारपूस करण्याची वृत्ती आहे. स्वीडनमध्ये लोक बोलत नाहीत ओळख दाखवत नाहीत. मी हसत हसतच त्यांना म्हटल की ही संस्कृती आमच्याकडेही येते आहे. त्यावर ते म्हणाले अस होउ देवू नका. त्यांना भारतीय लोकशाही बद्दलही बरच आकर्षण आहे. ते म्हणाले की मला इथल्या लोकशाही आणि नोकरशाही बद्दल त्यांना अभ्यास करायचा आहे. फार कमी वेळात आम्ही बरच बोललो शेवटी मी त्यांना माझा फेसबुक id दिला. स्वीडन मध्ये फेसबुक एवढ लोकप्रिय आहे की जवळ जवळ ५० टक्के स्वीडीश नागरिक फेसबुक वापरतात. Definitely we will meet again म्हणत त्यांनी माझा निरोप घेतला. माणस जोडायच्या मोहिमेवर निघालेला हा अवलिया पुढच्या मुक्कमी रवाना झाला.

No comments:

ShareThis

Registered With