दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त कोल्हापूरचे सुपुत्र महान मराठी दिग्दर्शक भालजी पेंढारकर एक चतुरस्त्र व्यक्तीमत्व होते. कोल्हापूर ही त्यांची कर्मभूमी. व्ही शांताराम त्यांचे मावसभाऊ होते. भालजींची आई राधाबाई आणि व्ही. शांताराम यांची आई कमलाबाई या सख्या बहिणी. मास्टर विनायक हे भालजींचे भाऊ.
भालजींनी अनेक महान मराठी चित्रपटांची निर्मिती केली आणि दिग्दर्शनही केले. त्यांचे छत्रपती शिवाजी, नेताजी पालकर, मराठा तितुका मेळवावा, गनिमी कावा, साधी माणस, मोहित्यांची मंजुळा, पावनखिंड, बहिर्जी नाईक, बाजीराव मस्तानी, महाराणी येसूबाई, वाल्मिकी, मीठ भाकर, सुनबाई हे चित्रपट खूप गाजले. ते मराठी चित्रपटांचे सुवर्णयुगच होते. मूक चित्रपटांपासून भालजींनी आपले करीयर सुरू केले. प्रसिद्ध प्रभात स्टुडिओ मध्ये त्यांनी बरीच वर्षे काम केले. कोल्हापूर चित्रपटसृष्टीतील इतर स्टुडियोतही त्यांनी काम केले. त्यांनी काही चित्रपटांसाठी गाणीही लिहिली. त्यांनी काही हिंदी चित्रपटांची निर्मिती केली त्यात छत्रपती शिवाजी, महारथी कर्ण आणि वाल्मिकी या चित्रपटांचा समावेश आहे.
१९८१ चा गनिमी कावा हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. १९९१ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
No comments:
Post a Comment