लोकपाल लटकले ...काल राज्यसभेत जी अभूतपूर्व परिस्थीती उद्भवली त्यामुळे लोकपाल अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडल आहे. सरकारकडे राज्यसभेतही बहुमत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. विरोधक तर सोडाच साथीदारही हे बील पास करायला तयार नाहीत. तब्बल १८० संशोधने विरोधकांनी दिली. सपा, बसपा, जेडीयू, आर् जे डी हे पक्ष म्हणतात की लोकपाल फारच कठोर आणि मजबूत कायदा आहे आणि त्यामुळे आम्हाला फासाला लावण्याची तयारी सरकार करत आहे. एवढया सगळ्या संशोधनानंतर लोकपाल बिलात नक्की काय शिल्लक राहणार हाही एक मोठा प्रश्न होता त्यापेक्षा हे बील राज्यसभेत सुरक्षित राहील ते काही अंशी बर झालं. अन्यथा मतदान झालं असत तर सरकारी बील पडल असत पुन्हा हे बील मागे गेल असत आणि पुन्हा सात-आठ महिन्यांच्या दीर्घ प्रक्रियेनंतर लोकसभेत आल असत. आता आशा करुयात की पाच राज्याच्या निवडणुकीत थोड फार यश मिळाल तर कॉंग्रेसच राज्यसभेतल बळही वाढेल आणि लोकपाल बील पास होईल.
अर्थात आता पुढची लढाई ही कॉंग्रेस विरुद्ध भाजपा, अण्णा, सपा, बसपा, संघ अशी रंगणार आहे. अण्णांना तर पुन्हा एकदा संधी आहे कॉंग्रेस विरोधी प्रचार करण्याची, रान उठवण्याची. दोन्ही पक्ष एकमेकांना दोष देतील. राजकीय मैदानात कोणी बाजी मारत हे त्या पक्षाची प्रचारयंत्रणा, कार्यकर्त्यांच बळ आणि धूर्तपणा यावर अवलंबून राहील. अस असलं तरी हे बील पास करून घेण्यात आलेल अपयश ही सरकारसाठी नामुष्कीच आहे यात वाद नाही.
No comments:
Post a Comment