२००७ मध्ये जेव्हा मी ब्लॉग लिहिण्यास (अर्थातच तोडक मोडक) सुरुवात केली होती त्यावेळी ब्लॉग विश्वात माझे काही मित्र निर्माण झाले होते. आज पाच वर्षांनंतर मी ज्यावेळी मागे वळून पाहतो त्यावेळी ह्या सर्वांची आठवण येते. खट्टा मिठा सारखा वाचनीय ब्लॉग २०१० लाच थांबला. पी के फडणीस सरांचा महाभारत ब्लॉग मात्र पळतोय. उनके दुश्मन है बहोत आदमी अच्छा होगा अर्थात हरेकृष्णाजी. हरेकृष्णाजी अजूनही सक्रीय आहेत त्याच उत्साहाने. प्राजक्ता पाटील, चकली, रुचिरा हे पाककलेवरचे ब्लॉग आजही आम्ही आवर्जून वाचतो. श्रीकृष्ण सामंत माझे गाववाले त्यामुळे आपुलकी असणारच. त्यांचा कृष्ण उवाच हा ब्लॉग मी अजूनही वाचतो. तुमचा अलीकडेच लिहिलेला "त्या वडाच्या झाडाखालच्या आठवणी" हा लेख मी वाचला. तुम्ही एका मिनिटात आम्हाला आमच्या गावी फिरवून आणता. आपला सिनेमास्कोप हा ब्लॉग माझ्या रिडींग लिस्ट मध्ये कायमच असतो. चित्रपटाचे नीटनेटके विश्लेषण वाचता येते आणि चित्रपट पहायचा की नाही हा निर्णय घेण सोप जात. नरेंद्र प्रभू यांचा ब्लॉगही २००८ ला सुरू झाला होता. प्रभू एक नियमित लेखक आहेत. मी नियमीत लेखक नसलो तरी वाचक मात्र आहे.
असे अनेक ब्लॉग आहेत ज्यांनी २००७-०८ ला सुरुवात केलेली पण आता ते बंद पडले आहेत. मोरपीस ब्लॉग २००९ च्या एका वर्षाच्या विश्रांती नंतर पुन्हा एकदा सक्रीय झाला. संजय सोनावनी यांचा ब्लॉग एका वेगळ्या वाटेने जाणारा ब्लॉग. सामाजिक सुधारणा, समानता, इतिहास अशा अनेक विषयांबाबत त्यांचे लिखाण असते. मी आवर्जून वाचतो. ब्लॉग ने इंटरनेट वर एक क्रांती आणली होती. अभीव्यक्तीची क्रांती. केवळ कथा आणि कविता म्हणजे लेखन हा मराठीतला समज दूर करण्यासाठी एक काळ जावा लागला. सातत्याने मी याबद्दल लिहीत होतो. ब्लॉग या शब्दाचा अर्थ कळायला थोडे दिवस जावे लागले. वैयक्तिक ब्लॉग हा दैनंदिनी असू शकतो हे ज्यावेळी मी लिहीत होतो त्यावेळी टीकाही सहन करत होतो. भाषाशुद्धी वाले तर नेहमीच व्याकरणावर घसरायचे त्यांच्या दृष्टीने व्यक्त होताना सुद्धा व्याकरणाचे नियम तपासूनच लिहायचे असते. असो निंदकाचे घर असावे शेजारी असच काहीस म्हणतात. अर्थात माझे ब्लॉग लोकप्रिय करण्यात माझे वाचक आणि टीकाकार या दोघांचाही हातभार आहेच. त्यांचे खूप खूप आभार. ऑर्कुट आणि फेसबुकच्या लोकप्रियतेमुळे आज ब्लॉगची लोकप्रियता थोडी कमी झाली आहे पण अजूनही ब्लॉगर्स तेवढ्याच जोमाने आणि उत्साहाने लिहीत आहेत. काही तासात २०१२ सुरू होतय हे नवीन वर्ष ब्लॉगर्सना भरभराटीचे जावो हीच सदिच्छा ..
२००८ सालात लिहिलेला लेखं जरूर वाचा...क्लिक करा...
२००८ सालात लिहिलेला लेखं जरूर वाचा...क्लिक करा...
No comments:
Post a Comment